ऑनलाईन फसवणूक file photo
रत्नागिरी

गिफ्ट खरेदी करण्याच्या बहाण्याने महिलेची १ लाखाची फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : कंपनीचा बॉस असल्याचे भासवून स्टाफसाठी सरप्राईज गिफ्ट देण्यासाठी ऑनलाईन गिफ्ट खरेदी करण्यास सांगून अज्ञाताने महिलेची तब्बल १ लाख ५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.

ही घटना गुरुवार, ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३६ वाजण्याच्या सुमारास कालावधीत आठवडा बाजार येथे घडली. याबावत श्वेता नथुराम साळसकर (रा. आठवडा बाजार, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी फिर्यादी या त्यांच्या घरी असताना अज्ञाताने त्यांच्या मेल आयडीवर व एक मेल पाठवून आपण त्यांच्या कंपनीचा बाँस जेसल मेहता असल्याचे भासवले.

इतक्यावरच न थांबता नंतर फिर्यादीच्या व्हॉटसअॅप नंबरवर त्यांच्याशी चंटिंग करून विश्वास संपादन केला.दरम्यान, स्टाफसाठी सरप्राईज गिफ्ट देण्यासाठी ऑनलाईन गिफ्ट खरेदी करण्यास सांगून क्रेडिट कार्ड व डेबीट कार्डवरून फिर्यादीची एकूण २१ गिफ्टसाठी १ लाख ५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी फिर्यादीने सोमवारी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT