शेंबवण येथे गॅसचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला. File Photo
रत्नागिरी

रत्नागिरी : शेंबवणेत गॅसची गळती; भडका उडून एकाचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

देवरुख : गणेश आगमनादिवशीच संगमेश्वर तालुक्यातील शेंबवणे गोमानेवाडी येथे सिलिंडर गळतीने भडका होऊन होरपळलेल्या एका प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाळू सोमा बांबाडे (वय 55) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शनिवारी घडलेल्या या घटनेने गणेश आगमनाच्या दिवशी बांबाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. यामुळे ऐन गणेशोत्सवात शेंबवणे गावावर शोककळा पसरली आहे.

बाळू बांबाडे हे गणेश मूर्तीची भक्तिभावे पूजा करत असताना त्यांची पत्नी या घरात सारवण करत होत्या. त्यांनी सारवण करताना त्यांचे पती बाळू बांबाडे यांना हाक मारून स्वयंपाक घरातील गॅस सिलिंडर बाजूला करण्यास सांगितले. बाळू बांबाडे हे गॅस सिलिंडर बाजूला करत असताना अचानकपणे त्यातून गळती सुरु झाली. सर्वत्र पसरल्यानंतर गॅसचा भडका उडला. या भडक्यात बाळू बांबाडे हे 90 टक्के होरपळून गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत असलेल्या बांबाडे यांना संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी शेजार्‍यांनी दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हालवण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असतानाच सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT