A big barge seen in the Dapoli Ladghar sea, the system is on alert mode
दापोली : पुढारी वृत्तसेवा
दापोली तालुक्यातील लाडघर समुद्रात टॉवर असलेला अजस्त्र बार्ज नजरेस पडला असून या बाबत सर्वच यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. कदाचीत हा बार्ज ऑईल रिक असण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
लाडघर आणि हर्णे समुद्राच्या मध्यभागी हा बार्ज नजरेस पडत आहे. समुद्रामध्ये असणारा ऑइलचा साठा तपासण्यासाठी हे बार्ज आले असावे असा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे. देशामध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्याने सगळी यंत्रणा सतर्क झाली आहे. तर हे बार्ज दाभोळच्या दिशेने सरकू लागले आहे.
जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटनासाठी आलेल्या भारतीयांवर गोळ्या झाडल्या होत्या. यामध्ये २६ निष्पाप भारतीयांचा बळी गेला होता. यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. यानंतर भारत सरकाने या हल्ल्याची गंभीर दखल घेत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले करत ते उद्धवस्त केले होते.
दरम्यान पाकिस्तानकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यासाठी भारतीय सैन्य तयार आहे. मात्र देशभरात अलर्ट घोषित करण्यात आला आहे. देशाला मोठा समुद्र किणारा लाभल्याने समुद्र किणाऱ्यावरूनही पाकिस्तानकडून संभाव्य हल्ल्याचा धोका लक्षात घेता किणारी भागालाही सुरक्षा यंत्रणांनी अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
त्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांनाही समुद्राच्या ठराविक भागात न जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जर कोणी ही सीमारेषा ओलांडली तर हल्ल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या संदर्भात मच्छीमारांची बैठक घेवून त्यांना सुरक्षेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.