रत्नागिरी : पडीक जमीन, शेताचे बांध, माळरानावर दलदलीच्या ठिकाणी शेतकर्यांनी बांबू लागवड करावी म्हणून विविध विभागांनी मेहनत घेतली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाअंतर्गत यंदा सन 2025-26 वर्षासाठी रत्नागिरी जिल्ह्यात 450 हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 50.47 हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड झालेली आहे. तर अद्याप गुहागर, संगमेश्वर, लांजा आणि रत्नागिरी तालुक्यात अद्यापही बांबू लागवड झालेली नाही. मागील वर्षी 21.80 हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड झाली होती.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बांबू लागवडीच्या माध्यमातून शेतकर्यांना सक्षम व शेतकर्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने बांबू लागवड कार्यक्रम सुरू आहे. बांबू इतर सर्व झाडांपेक्षा जास्त प्रमाणात हवेतील कार्बन शोषते आणि ऑक्सिजन देते. त्यामुळे बांबू लागवड हा ग्लोबल वॉर्मिगवर एक उत्तम उपाय ठरू शकतो. त्यामुळे बांबूची शेती करण्यासाठी शेतकर्यांना मनरेगातर्फे प्रोत्साहन दिले जात आहे. त्याला जिल्ह्यातील शेतकर्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने बांबू लागवड अभियान जिल्ह्यात गतीने सुरू आहे. आतापर्यंत 50.47 हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड झाली आहे. बांबू लागवड करण्यासाठी शासनाकडून प्रोत्साहन मिळत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात बांबू लागवड सुरू झाली आहे. यंदाच्या वर्षी 450 हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचे उद्दिष्ट असून आतापर्यंत 50 हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचे काम झाले आहे.शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी