गांग्रईत देशातील 45 चित्रकार कलाकारांची मांदियाळी 
रत्नागिरी

Ratnagiri : गांग्रईत देशातील 45 चित्रकार कलाकारांची मांदियाळी

कार्यशाळेस जोशात प्रारंभ; आनंददायक अनुभवाची पर्वणी

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : कोकणच्या निसर्गाची भुरळ केवळ पर्यटक, कवी आणि लेखकांनाच पडते असे नव्हे तर, येथील निसर्गाचं पावसाळ्यातील मनमोहक रुप पाहून चित्रकारदेखील मोहित होतात. निसर्गातील या विविध छटांचे दर्शन कलारसिकांना व्हावे म्हणून चिपळूण तालुक्यातील गांग्रई येथील निसर्गरम्य पुष्कर पर्यटन केंद्रात आज बुधवारपासून 13 ऑगस्टपर्यंत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यात भारतातील सुमारे 45 स्त्री-पुरुष चित्रकार कलाकार कलाकृती साकारणार आहेत.

ही सर्व कलाकार मंडळी पंजाब, चेन्नई, नागपूर, नाशिक, पुणे, कोकण विभाग मुंबई, कोल्हापूर, नवी मुंबई आदी ठिकाणाहून येणार आहेत. या कार्यशाळेदरम्यान कलारसिकांनी गांग्रई येथे भेट देवून नामवंत कलाकारांना कलाकृती साकारताना प्रत्यक्ष पाहावे, असे आवाहन ज्येष्ठ चित्रकार- शिल्पकार प्रकाश राजेशिर्के व पुष्कर चव्हाण यांनी केले आहे.कोंकणातील निसर्गाच्या सान्निध्यात ही कलाकारांची मांदियाळी सर्वानाच प्रेरणादायक ठरणार आहे आणि सर्वानाच म्हणजे कलाकारांना, कलारसिकांना, कलाविद्यार्थ्यांना एका वेगळ्याच आनंदायक अनुभवाची अनुभूती देणार आहे. या कार्यशाळा समाप्तीनंतर निवडक कलाकृतीचे प्रदर्शन मुंबईच्या पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या कलादालनात जानेवारी 2026 मध्ये करण्यात येणार आहे. यानिमित्त सर्व कलाकारांची थोडक्यात माहिती व एक चित्र असलेला एक छोटासा कॅटलॉगही प्रसिद्ध करण्याचा मानस आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT