कोकण

रत्नागिरी : ‘नॅक’मूल्यांकनातील यश मेहनतीचे फळ

backup backup

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाला 'नॅक'मध्ये मिळालेलं यश हे सर्वांच्या मेहनतीचं फळ असल्याचं प्रतिपादन कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी केले. 165 वर्षांचे असलेले हे मुंबई विद्यापीठ किती गौरवशाली आहे आणि याच विद्यापीठात काम करण्याची संधी आपल्यासारख्या कर्मचार्‍यांना मिळालेली आहे, हे आपलं भाग्य आहे, असेही यावेळी कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर म्हणले. त्या नंतर नॅक मूल्यांकनामध्ये मुंबई विद्यापीठाला ++ ग्रेड 3.68 उॠझ सह मिळाली. यासाठी योगदान दिल्याबद्द्ल कुलगुरू यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाचे मानचिन्ह देऊन प्राध्यापक व कर्मचारी यांना गौरवण्यात आले. यावेळी र् विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव सुधीर पुराणिक, अधिष्ठाता कॉमर्स अँड मॅनेजमेंट डॉ. अजय भामरे, संचालक विद्यार्थी विकास विभाग डॉ. सुनील पाटील व अभियंता विनोद पाटील उपस्थित होते.

कुलगुरू यांनी उपपरिसर रत्नागिरी येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी उपपरिसराच्या कर्मचार्‍यांशी संवाद साधला. त्यानंतर नॅकमध्ये मुंबई विद्यापीठाला ++ग्रेड 3.68 उॠझ सह मिळाली, यासाठी योगदान दिल्याबद्द्ल कुलगुरू यांच्याहस्ते मुंबई विद्यापीठाचे मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या वेळी रत्नागिरी उपपरिसराचे प्रभारी संचालक डॉ श्रीकिशोर सुखटणकर, कुलसचिव अभिनदांन बोरगावेंसह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT