कोकण

रत्नागिरी : पत्रकारांचा अवमान करणाऱ्या ‘त्या’ विद्यापीठ अधिकाऱ्यांना मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुनावले

मोहन कारंडे

दापोली; पुढारी वृत्तसेवा : दापोली येथे आज (दि.१४) ५० वी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक २०२२ आयोजित केली होती. यावेळी येथील कृषि विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत असभ्य वर्तन करत बाहेर जाण्यास सांगितले. यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी सर्व पत्रकारांची मनधरणी करत त्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या वतीने ५० वी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक २०२२ दापोली येथे आज पार पडली. यावेळी कृषि मंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते. कृषी प्रदर्शन पाहत असताना कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्याने "सगळ्यांनी बाजूला व्हा, मी प्रदर्शन पाहतो" असे म्हणत वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगितले. यावेळी कृषी मंत्री सत्तार प्रदर्शनातील प्रत्येक विषयाची माहिती घेत होते. त्यांना याबाबत समजताच त्यांनी त्या अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. मला पत्रकारांशी संवाद साधायचा आहे, असे म्हणत त्यांनी पत्रकारांची झालेल्या प्रकाराबाबत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT