कोकण

ग्रामपंचायतीत आता महा-ई ग्रामप्रणाली!

दिनेश चोरगे

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  ग्रामपंचायतींच्या कामकाजामध्ये एकसूत्रीपणा व प्रशासकीय गतीमानता आणणे व नाागरिकांना सूलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये महा -ई- ग्राम प्रणालीचा वापर करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या
आहेत. ग्रामीण पातळीवरील भौतिक विकासाचे नियोजन करण्यासाठी पंचायत समित्या, जिल्हा परिषद व राज्य शासनाला पायाभूत सुविधांची माहिती सहजरित्या उपलब्ध व्हावी, यासाठी ग्रामविकास विभागाने महा ई ग्राम प्रणाली विकसित केली आहे.

ग्रामपंचायतीकडील नमुना नं 1 ते 33 संगणकीकृत करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सन 2023-24 पासून कराची फेर आकारणी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतीचे नमुना नं. 8 मधील तपशील महा ई ग्राममध्ये नोंदवण्यासाठी कालबध्द मोहीम राबवावी. अन्य खासगी संगणक प्रणाली न वापरता पूर्ण महा ई ग्राम ही प्रणालीच वापरण्यात यावी. ग्रामपंचायत स्तरावरील मुलभूत सुविधांची एकत्रीत माहिती प्रशासकीय यंत्रणांना मिळणार आहे. ऑनलाईन कर भरणा सुविधा अ‍ॅपच्या माध्यमातून निर्माण करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीचा मासिक प्रगती अहवाल महा ई ग्राममध्ये दरमहा 5 तारखेपूर्वी भरावा लागणार आहे. महा ई ग्राम प्रणालीच्या वापरामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायती पेपरलेस होणार आहेत.

महा ई ग्रामच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना देण्यात येणार्या सेवा गतीने देण्यास मदत होणार आहे. केंद्र शासनाच्या शाश्वत विकासाच्या ध्येयाशी संबंधित सुशासनयुक्त गाव ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणणे शक्य होणार आहे.
महा ई ग्राम प्रणालीचा ग्रामपंचायत स्तरावर तत्काळ वापर करावा. या प्रणालीच्या वापराबाबत ग्रामसेवक व केंद्र चालकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच प्रणाली वापराचा व जिल्ह्याच्या प्रगतीचा नियमितपणे आढावा घेण्यात येणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT