राजापूर; पुढारी वृत्तसेवा : राजापूर तालुक्याचा दहावी परीक्षेचा एकूण निकाल 98.94 टक्के लागला आहे. गतवर्षीपेक्षा निकालामध्ये वाढ झाली आहे. परीक्षेला बसलेल्या 1990 विद्यार्थ्यांपैकी 1969 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यापैकी 727 विद्यार्थ्यांनी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविले आहे. तर 858 विद्यार्थी प्रथम व 334 विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातील 49 पैकी 41 माध्यमिक शाळांचे निकाल 100 टक्के लागले आहेत.
न्यू इंग्लिश स्कूल जैतापूर या शाळेचा निकाल 91 टक्के लागला असून दीप दळवी (98.80 टक्के), शमिका डोर्लेकर (86.60 टक्के), आर्या साखरकर (79.60) यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकाविले. नॅशनल इंग्लिश स्कूलचा निकाल 100 टक्के लागला आहे. तेजस कोळेकर (97), झोया कोंडकर (95.80), आफीया चौगुले (95.20) यांनी प्रथम तीन क्रमांक पटकाविले आहेत.
राजापूर हायस्कूलचा निकाल 96.23 टक्के लागला आहे. चिन्मयी कानविंदे (95) प्रथम , शिवम गुरव व सोहम सावंत (93.40) यांनी द्वितीय तर सोहम धुळप (93) याने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. विद्या निकेतन येळवण या हायस्कूलचा निकाल 100 टक्के लागला असून त्यामध्ये सोनल फाकांडे (83.40) वर्षा जाधव (82.80), भक्ती शिंदे (75.20) यांनी अनुकमे पहिले तीन क्रमांक पटकाविले.
माध्यमिक विद्यालय गोठणे दोनिवडे या शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून त्यामध्ये समृद्धी हातणकर (89.20), रोशन झापणेकर (88.60), मानसी नाचणेकर (87.80) यांनी अनुक्रमे यश मिळवले. गांगेश्वर विद्यालय ससाळे या हायस्कूलचा निकाल 100 टक्के लागला असून गणेश कांबळे (84.80), संजीवनी पांचाळ (82.80), करिश्मा पांडुरंग भागण (79) यांनी अनुक्रमे यश
मिळवले.
साने गुरुजी विद्यामंदिर जानशी या हायस्कूलचा निकाल 100 टक्के लागला आहे. हायस्कूलमध्ये तेजा रायकर (88.40), चिराग रांबाडे (88.20), रेणुका जैतापकर (87.20) यांनी यांनी अनुक्रमे यश मिळवले. माध्यमिक विद्यामंदिर ताम्हाणे या हायस्कूलचा निकाल 100 टक्के लागला आहे. ऋतिका अमृते (88.80), सिध्देश चंदूरकर (88.20), स्वराज वाफेलकर (87.40) यांनी यांनी अनुक्रमे यश मिळवले. वी. सी. गुर्जर हायस्कूल कशेळी या हायस्कूलचा निकाल 100 टक्के लागला आहे. हायस्कूलमध्ये आयुष बावकर (92.20) प्रथम, श्रावणी भोसले व रोहित फणसे (89.60) यांनी द्वितीय तर सायली नवाळे (89) हिने तृतीय क्रमांक पटकाविला.
नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय ओणी या हायस्कूलचा निकाल 98.68 टक्के लागला आहे. हायस्कूलमध्ये प्राची जाधव (98.68), सलोनी सोगम (87.40), शर्विल पाटील (86.80) यांनी अनुक्रमे यश मिळवले. माध्यमिक विद्यामंदिर वडदहसोळ या हायस्कूलचा निकाल 100 टक्के लागला आहे. हायस्कूलमध्ये तन्वी गितये (89.40), गौरी खानविलकर (89.20), तनेजा गितये (84.60) यांनी अनुक्रमे यश मिळवले. श्री महाकाली इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नवेदर आडीवरे या हायस्कूलचा निकाल 100 टक्के लागला आहे. आर्या रूमडे (90.20), तन्वी लिंबाणी (88), स्वरांगी जायदे (87.60) यांनी यांनी अनुक्रमे यश मिळवले.
न्यू इंग्लिश स्कूल सोलगाव या हायस्कूलचा निकाल 100 टक्के लागला आहे. हायस्कूलमध्ये सुदेश सोडये (84), सृष्टी तेरवणकर (83.20), प्रीती कदम (83) यांनी अनुक्रमे यश मिळवले. जिजामाता विद्यामंदिर रायपाटण या हायस्कूलचा निकाल 100 टक्के लागला आहे. हायस्कूलमध्ये सूचिता कामतेकर (85 टक्के), पूर्वा रोडे (81.40 टक्के), सुषमा शेटये (80.40 टक्के) यांनी अनुक्रमे यश मिळवले. माध्यमिक विद्यामंदिर सौंदळ या हायस्कूलचा निकाल 100 टक्के लागला आहे. हायस्कूलमध्ये रिया मांजरे (84.40), तनुजा मांजरे (81.20), विक्रांत शिंदे (77) यांनी अनुक्रमे यश मिळवले. बापू गोखले माध्यमिक विद्यालय प्रिंदावण या हायस्कूलचा निकाल 100 टक्के लागला आहे. हायस्कूलमध्ये मनाली शिवणेकर (89.60), स्वप्नाली कार्शिंगकर (81.20), मंथन गुरव (81.20), अमोल तिर्लोटकर (80.80), प्राची गुरव (80.80) यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकाविले आहेत.
श्री सद्गुरू गगनगिरी स्वामी विद्यालय तुळसवडे या हायस्कूलचा निकाल 100 टक्के लागला आहे. हायस्कूलमध्ये सानिका आडीवरेकर (92.20), श्रद्धा नारकर (91.80), प्रसाद सप्रे (88.60) यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकाविले आहेत. ज्ञानविकास सहकारी हायस्कूल भालावली या हायस्कूलचा निकाल 100 टक्के लागला आहे. हायस्कूलमध्ये सदिच्छा मांजरेकर (77.40), श्रेया भोवड (73.60), भावेश गुरव (73.60), सानिया पाटील (73) यांनी पहिले तीन क्रमांक पटकाविले आहेत.