कोकण

कामाक्षीच्या प्रियकराने सांगितले खुनाचे रहस्य

backup backup

आंबोली; पुढारी वृत्तसेवा : गोव्यातील तरूणी कामाक्षी उड्डापनोवा (वय ३०) हिचा प्रियकराने पर्वरीतील एका फ्लॅटमध्ये खून करुन मृतदेह दरीत फेकून दिल्याची घटना घडली. ही घटना ३० ऑगस्ट रोजी घडली होती. मात्र, मृत तरूणी कामाक्षी हिच्या नातेवाईकांनी ती बेपत्ता असल्याची तसेच संशयित म्हणून प्रियकराचे नाव दिल्याने सदर घटना उघडकीस आली. त्यानंतर आज (दि. १ सप्टेंबर) पर्वरी पोलिसांनी संशयित आरोपी प्रियकराला सोबत आणून आंबोली घाटात मृतदेह टाकलेल्या ठिकाणचा शोध घेतला. त्यानंतर कामाक्षीचा मृतदेह ५० फुट दरीतून हस्तगत केला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी प्रियकर प्रकाश चुंचवाड (वय २२) तसेच अन्य एक साथीदार निरूपदी कड (वय २२) यांना पोलिसांनी अटक केली.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, पर्वरीत (गोवा) गॅरेज चालवणारा प्रकाश चुंचवाड (वय २२) याचे कामाक्षी उड्डापनोवा (वय २८) या तरुणीवर प्रेम होते. कालांतराने त्यांच्यात वाद होऊ लागल्याने कामाक्षीने प्रेम प्रकरण पुढे चालू ठेवण्यास नकार दिला. मात्र, प्रकाशला ही गोष्ट रुचली नाही. तो तिला त्रास देऊ लागला.

कामाक्षी आणि प्रियकर प्रकाशमध्ये वाद

मंगळवारी (दि. २९ ऑगस्ट) रोजी मध्यरात्री प्रकाशला समज देण्यासाठी कामाक्षीने म्हापसा येथे बोलावले होते. तिथे त्यांच्यात भांडण झाले, सोबत कामाक्षीचा मित्र आणि मैत्रीण होते. यावेळी प्रकाश आणि कामाक्षी यांच्यात वाद झाला. दरम्यान त्याने तिला मारहाण देखील केली होती. यावेळी कामाक्षी आणि सोबत आलेल्या दोघांनी मिळून प्रकाशचा मोबाईल फोडला. त्यानंतर कामाक्षीने म्हापसा पोलीस स्थानकात प्रकाशच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी दोघांना बोलावून कडक शब्दांत समज दिली होती. त्यांच्याकडून लेखी हमी घेतली. त्यानंतर प्रकाशला सोडून दिले. तेव्हापासून कामाक्षी गायब होती. त्यानंतर कामाक्षीच्या भावाने ३० ऑगस्ट रोजी पर्वरी पोलिसांत ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तर पर्वरी पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि इतर तपास करत गुरुवारी (दि. ३१) रात्री पोलिसांनी संशयित म्हणून प्रकाशला तसेच त्याचा अन्य एका निरूपदी कड (वय २२) नामक मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली. आणि सदर घटना उघडकीस आली.

आंबोली घाटात ५० फूट खोल दरीत सापडला मृतदेह!

'मी कामाक्षीचा फ्लॅटवर खून करून आंबोली घाटात नेऊन जमिनीत गाडला. तिने माझ्याशी प्रेमसंबंध तोडून दुसऱ्याशी सूत जुळवले होते म्हणून हे कृत्य केले', असे त्याने गोवा पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर अधिक तपास करण्यासाठी पोलीस फॉरेन्सिक टीमसोबत संशयिताला घेऊन शुक्रवारी सायंकाळी आंबोली घाटात पोहचले. तसेच संशयिताने आंबोली घाटातील दरीत मृतदेह टाकलेले ठिकाण दाखवल्यावर तेथे कामाक्षीचा ड्रेससह मृतदेह कुजलेल्या तसेच प्लास्टीक'च्या पिशव्यांत गुंडाळलेला अवस्थेत सापडला. दरम्यान, ३० तारखेला संशयित प्रियकराने कामाक्षीचा खून केल्यावर सदर तिचा मृतदेह प्लास्टिक पिशव्यांमधे गुंडाळला होता, त्यानंतर त्याच रात्री गोव्यातून आंबोली घाटात येत हा मृतदेह आंबोली घाटातील दरीत फेकला होता. तर शुक्रवारी सदर मृतदेह सापडल्यावर तो २ दिवसापूर्वींचा असल्याने कुजलेला होता. यावेळी सदर मृतदेहाचा एक पाय, एक हात गायब होता. जंगली हिंस्रक प्राण्याने लचके त्या मृतदेहाचे तोडले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. सदर मृतदेह हा दरीतून आंबोली रेस्क्यू टीमने बाहेर काढला. त्यानंतर गोवा पोलीसांनी हीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सावंतवाडी नंतर पर्वरी-गोवा येथे घेऊन गेलेत.

घाटातील ५० फुट खोल दरीत तिचा मृतदेह सापडला!

संशयिताने मृतदेह फेकताना त्याच्या एका निरूपदी कड नावाच्या मित्राला सोबत घेतले होते. मात्र, सदर संशयितांचा मित्र हा आपल्यास त्या खुना बद्दल प्रथम माहिती न्हवती. आंबोलीत आल्यावर मृतदेहाबद्दल समजले, असे त्याच्या निरूपदी ह्या मित्राचे म्हणणे आहे, तर मृतदेहाची व्हिलेवाट लावतना संशयिताने त्याच्या ताब्यातील क्रेटा कार गाडीचा उपयोग केला होता. तर हत्या करणाऱ्यासाठी धारधार जे हत्यार संशयिताने वापरले ते शुक्रवारी उशिरा पर्यंत ताब्यात घेण्याचे काम चालू होते. तर सदर घटनेचा तपास गोवा पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT