कोकण

Mumbai- Kochuveli : मुंबई-कोच्चुवेलीदरम्यान २८ अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन धावणार

अविनाश सुतार

रोहे : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई – मऊ / कोच्चुवेली दरम्यान २८ अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन धावणार आहेत. यातील मुंबई कोच्चुवेली या गाडीचा कोकणवासीयांना फायदा होणार आहे. Mumbai- Kochuveli

मध्य रेल्वे कडुन चालविण्यात येणाऱ्या विशेष गाडयांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मऊ विशेष (४ फेर्‍या) गाडी क्रमांक ०१०७९ ही विशेष गाडी बुधवारी दि. १०.०४.२०२४ आणि दि. ०१.०५.२०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून २२.३५ वाजता सुटेल आणि मऊ येथे तिसऱ्या दिवशी ११.१० वाजता पोहोचेल. (२ फेर्‍या), गाडी क्रमांक ०१०८० विशेष गाडी शुक्रवार दि. १२.०४.२०२४ आणि दि. ०३.०५.२०२४ रोजी मऊ येथून १३.१० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ००.४० वाजता पोहोचेल. (२ फेर्‍या) या गाडीसाठी दादर, ठाणे कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, विरांगना लक्ष्मीबाई झांसी, उरई, गोविन्दपुरी, फतेहपुर, प्रयागराज, जंघई, जौनपूर, शाहगंज आणि आज़मगड येथे थांबे देण्यात आले आहे. Mumbai- Kochuveli

लोकमान्य टिळक टर्मिनस-कोच्चुवेली साप्ताहिक विशेष (२४ फेर्‍या) गाडी क्रमांक ०१४६३ साप्ताहिक विशेष दि. ११.०४.२०२४ ते दि. २७.०६.२०२४ पर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई १६.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २०.४५ वाजता कोचुवेली येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४६४ साप्ताहिक विशेष कोचुवेली दि. १३.०४.२०२४ ते दि. २९.०६.२०२४ पर्यंत दर शनिवारी १६.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २१.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. या गाडीसाठी ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन, कारवार, कुमटा, कुंदापुरा, उडुपी, मंगळुरु जंक्शन, कासरगोड, कण्णूर, कोषिक्कोड, तिरूर, षोरणूर, त्रिसूर, एरणाकुलम जं, कोट्टानम तिरुवल्ला, चेंगन्नूर, कायमकुलम आणि कोल्लम जं. आदी ठिकाणी थांबे देण्यात आले आहे.

उन्हाळी विशेष ट्रेन या गाड्यांच्या आरक्षणासाठी ०१०७९ आणि ०१४६३ साठी विशेष शुल्कावर बुकिंग दि. ०८.०४.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल. विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT