Ladki Bahin Yojana
"माझी लाडकी बहीण योजना" लाभार्थींची 'निवड'  Phdhari Photo
महाराष्ट्र

माझी लाडकी बहीण योजना : 'अशी' होणार लाभार्थींची निवड

sonali Jadhav

मुंबई : राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात जाहीर केलेल्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' या योजनेच्या लाभार्थी निवडीचे अधिकार अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्यसेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी देण्यात आले आहेत. Ladki Bahin Yojana:

योजनेचा उद्देश काय आहे?

राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, आरोग्य आणि पोषण यामध्ये सुधारणा तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा हा या योजनेचा उद्देश आहे.

प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात दरमहा १ हजार ५०० इतकी रक्कम जमा केली जाईल. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे दीड हजारपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे महिलेस देण्यात येईल.

पात्रता निकष काय आहे?

  • महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी आवश्यक.

  • विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.

  • वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत.

  • अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते आवश्यक.

  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त नसावे.

आवश्यक कागदपत्रे

  • ऑनलाईन अर्ज.

  • आधार कार्ड.

  • अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.

  • सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला

  • उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य.

  • बैंक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.

  • पासपोर्ट आकाराचा फोटो.

  • रेशनकार्ड.

  • सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

SCROLL FOR NEXT