Tukaram Mundhe सध्या आपल्या धडक कारवायांमुळे चर्चेत असलेल्या तुकाराम मुंढे यांची एक वेगळीच बाजू एका कार्यक्रमात पाहायला मिळाली. कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे यांची ओळख आहे. २१ वर्षाच्या त्यांच्या सरकारी नोकरीत २५ वेळा बदली झाली आहे. त्यांच्या कडक स्वभावामुळे अनेकांना ते नकोसे होतात आता महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या त्यांच्या अनेक ठिकाणी मुलाखती होत आहेत. अशातच प्रसिद्ध लेखक कवी अरविंद जगताप यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली यामध्ये ते चक्क त्यांच्यावरच लिहलेल्या पत्रावर खळखळून हसताना दिसले.
जगतात यांचे पत्र ऐकून मुंढेनाही हसू आवरल नाही
अरविंद जगताप यांनी त्यांच्या अनोख्या शैलित ही पत्र लिहले आहे. या प्रकट मुलाखतीत त्यांनी ती तुकाराम मुंढे यांना ते पत्र ऐकवले. एफडीएच्या कारवाया व त्यामुळे मुंढे यांची होत असलेली चर्चा यावर त्यांनी मर्मविनोदी शैलित एक सुंदर ओघवत्या शैलित पत्र लिहले आहे आहे. याच्या शेवटचे वाक्य एकून तुकाराम मुंढे यांच्यासह प्रेक्षागृहही खळखळून हसत असल्याचे दिसत आहे.
प्रिय तुकाराम मुंढे
अरविंद जगताप यांनी सध्याच्या हॉटेलमध्ये जेवायला जाणारे लोक, बाहेर खाणारे लोक यांच्यावर भाष्य केले आहे. तुमच्यामुळे आमच्या सारख्या सामान्य माणसाला जागे केले आहे. आम्ही बाहेरचे भेसळयुक्त कित्येक वर्षे खात होतो पण तुमच्यामुळे ते आता आम्हाला समजले आहे. नकली पणीर, जेवणाचा दर्जा याचे आता आम्ही विचार करतोय, रात्री उशिरा आलेल्या नवऱ्याकडे जसे संशयाने बायको बघते तसे आम्ही आता पनिरकडे संशयाने बघतो. असे वाक्य येताच तुकाराम मुंढे यांना खळखळून हसू फूटले.
चला हवा येऊ द्यामधून अरविंद जगताप यांची ओळख
अरविंद जगताप हे समकालीन मराठी साहित्य, नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक ठळक आणि प्रभावशाली नाव आहे. कवी, कथा, पटकथा, संवादलेखक आणि गीतकार म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र शैली निर्माण केली आहे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात कलाकार सागर कारंडे हा एक पत्र वाचून दाखवत असे. सामाजिक परिस्थितीवरील हे केलेले भाष्य मनाला हेलाकावून सोडत असत. जरी ते सादर करणार कलाकार स्क्रिनवर असत तरी त्याचे शब्द जगताप यांचे होते. या पत्रांमुळे त्यांनी एक वेगळीच ओळख मिळाली.
तुकाराम मुंढे यांच्या कारवायांचीच चर्चा
शिस्तप्रिय आणि आक्रमक कारभारासाठी ओळखले जाणारे वरिष्ठ सनदी अधिकारी (IAS) तुकाराम मुंढे यांची मे २०२६ मध्ये एफडीए आयुक्त म्हणून त्यांच्याकडे पदभार आला. मध्ये सूत्रे स्वीकारल्यापासून त्यांनी अन्न व औषध भेसळीविरोधात राज्यभर धडक मोहीम उघडली आहे.कठोर कारवाई: हॉटेल्समधील अस्वच्छता, भेसळयुक्त पनीर, दूध आणि निकृष्ट अन्नसाठ्याविरोधात मोठ्या प्रमाणात छापेमारी केली आहे.