साहित्य संमेलनाच्या दिल्ली कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. Pudhari Photo
महाराष्ट्र

दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाला सर्वोतोपरी पाठबळ : मुख्यमंत्री

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan | साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला राज्य सरकार सर्वतोपरी पाठबळ देईल आणि साहित्य संमेलन यशस्वी होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दिल्लीत होत असलेल्या साहित्य संमेलनाच्या दिल्ली कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे संमेलन दिल्लीत होणार असल्याने या संमेलनाला विशेष महत्व आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दिल्लीत होणारे हे साहित्य संमेलन निश्चितच भव्य होईल. हे संमेलन देशातील नव्हे तर जगभरातील मराठी माणसांसाठी अभिमानास्पद ठरेल. साहित्य संमेलनाचे आयोजन यशस्वी व्हावे यासाठी विविध यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनही पुर्ण ताकदीने संमेलनाच्या पाठीशी आहे. राजधानीत होणारे हे साहित्य संमेलन विचारप्रवर्तक ठरेल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

२१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. सरहद, पुणे संस्थेच्या वतीने या संमेलनाचे आयोजन केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहित्य संमेलनाचे उद्घाटक आहेत तर शरद पवार साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. दिल्लीतील जुन्या महाराष्ट्र सदनात साहित्य संमेलनाचे कार्यालय उभारण्यात आले. या कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री तथा संमेलनाचे सरकार्यवाह मुरलीधर मोहोळ, सहसंयोजक लेशपाल जवळगे, अतुल जैन, आनंद रेखी, प्रदीप पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT