विदर्भात कोण मारणार बाजी? Pudhari Photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Vidharbha Assembly Election Result : बुलढाण्यात 7 पैकी 4 जागांवर महायुती विजयी

राज्यातील मोठ्या नेत्यांचे भवितव्य 'ईव्हीएम'मधून उलगडणार

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यभरात बुधवारी (दि.20) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले. आज (दि.23) मतमोजणी संपन्न होत आहे. विदर्भातील एकूण 62 मतदारसंघ आहेत. या 62 मतदारसंघात जनतेचा कौल कुणाला मिळणार? विदर्भात महायुती बाजी मारणार की महाविकासआघाडी? हे आज मतमोजणीनंतर स्पष्ट होणार असल्यामुळे सर्वांनी त्याची आतुरता लागली आहे. विदर्भात कोणाचे पारडे जड राहणार हे आज कळणार आहे, विदर्भात एकूण 65.11 टक्के मतदान झालं आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत हे मतदान तीन टक्क्यांनी वाढले आहे. लाडकी बहीण योजनेचा यासाठी फायदा झाला की, विदर्भात ओबीसी फॅक्टरने आपली जादू केली हे दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.

राज्यातील मोठ्या नेत्यांचे भवितव्य आज ठरणार आहे. त्यामध्ये भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, काँग्रेस नेते नाना पटोले, माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक दिग्गजांचं काय होणार? हे सुद्धा दुपारपर्यंत कळणारचं आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व 288 विधानसभा जागांवर सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि लोकांनी 1,00,186 बूथवर 4,100 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद केले.

टपाल मत मोजणीला सुरुवात

नागपूर दक्षिण-पश्चिममधून देवेंद्र फडणवीस आघाडीवर

टपाल मत मोजणीला सुरुवात

साकोलीमधून नाना पटोले आघाडीवर

टपाल मतदान

पोस्टल मतदान - चंद्रपूर ब्रह्मपुरी मतदार संघामध्ये विजय वडेट्टीवार आघाडीवर

पोस्टल पोस्टल - भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे मतदान कामठीतून आघाडीवर

पोस्टल मतदान- हिंगणा विधानसभा भाजपचे समीर मेघे आघाडीवर

पोस्टल मतदानातून - काटोलमध्ये भाजपाचे उमेदवार चरण सिंग ठाकूर आघाडीवर

बुलढाणा मतदारसंघ

पहिल्या फेरीतून बुलढाण्यातून शिंदे शिवसेनेचे संजय गायकवाड 309 मतांनी आघाडीवर

वाशिम

वाशिम जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघात टपाली मत मोजणीला उशिरा सुरुवात

वर्धा

वर्ध्यातून काँग्रेसचे शेखर शेंडे 113 मतांनी आघाडीवर

वाशिम

पहिल्या फेरीअखेर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार डॉ. सिद्धार्थ आकाराम देवळे 212 मतांनी आघाडीवर

अकोला पूर्व

पहिल्या फेरीमध्ये अकोला पूर्वमधून भाजपचे रणधीर सावरकर आघाडीवर

बुलढाणा

मेहकर मतदारसंघात महायुतीचे संजय रायमूलकर पोस्टल मतदान पहिल्या फेरीत 817 मतांनी आघाडीवर.

गडचिरोली

गडचिरोली मतदार संघातून भाजपचे मिलिंद नरोटे आघाडीवर

बडनेरा मतदार संघ

बडनेरामतदार संघातून रवी राणा आघाडीवर

गोंदिया

गोंदियातून भाजपचे विनोद अग्रवाल आघाडीवर

उमरेड राखीव मतदार संघ

पहिल्या फेरीमध्ये नागपूर जिल्ह्यातील उमरेड राखीव मतदार संघात काँग्रेसचे संजय मेश्राम 813 मतांनी आघाडीवर

अहेरी मतदारसंघ

धर्मरावबाबा आत्राम यांना दुसऱ्या फेरीत २२५१ मतांची आघाडी

आरमोरी विधानसभा दुसऱ्या फेरीत भाजपचे कृष्णा गजबे 1476 मतांनी आघाडीवर

गडचिरोली

भाजपचे डॉ. मिलींद नरोटे तिसऱ्या फेरीत 3522 मतांनी आघाडीवर

अहेरी विधानसभा

चौथ्या फेरीअखेर महायुतीचे धर्मरावबाबा आत्राम 3 हजार मतांनी आघाडीवर

रामटेक

रामटेक मतदारसंघातून विशाल बरबटे आघाडीवर

चंद्रपूर जिल्हा -70 राजुरा विधानसभा

अॅड. वामनराव चटप 194 मताने पुढे

वाशिम मतदारसंघ - श्याम खोडे 1015 मतांनी आघाडीवर

वर्धा मतदारसंघ - शेखर शेंडे 991 मतांनी आघाडीवर

आरमोरी विधानसभा

चौथ्या फेरीत काँग्रेसचे रामदास मसराम 571 मतांनी आघाडीवर

वाशिम मतदारसंघ

उद्धव ठाकरे शिवसेनेचे डॉ. सिद्धार्थ देवळे 800 मतांनी आघाडीवर

आरमोरी विधानसभा

पाचव्या फेरीत काँग्रेसचे रामदास मसराम 2415 मतांनी आघाडीवर.

बल्लारपूर विधानसभा

बल्लारपूरातून मतदार संघातून सुधीर मुनगंटीवार 2105 मतांनी आघाडीवर

अकोला पूर्व मतदार संघ

8 व्या फेरीत भाजपाचे रणधीर सावरकर 27770 मते घेऊन आघाडीवर

मुर्तिजापूर

मुर्तिजापूर मतदारसंघात 5896 मतांनी भाजपाचे हरीश पिंपळे आघाडीवर

बाळापूर

बाळापूर मतदार संघात 7399 मतांनी शिवसेना उबाठाचे नितीन देशमुख तिसऱ्या फेरीत आघाडीवर

अकोट

अकोट मतदार संघात 7818 मतांनी भाजपचे प्रकाश भारसाकळे आघाडीवर

बुलढाणा

बुलढाणा मतदारसंघांतून संजय गायकवाड 3017 मतांनी आघाडीवर

गडचिरोली

कांग्रेसचे मनोहर पोरेटी यांना 8 व्या फेरीत 1380 हजार मतांनी आघाडीवर

चिमूर

चिमुर विधानसभा मतदार संघामध्ये सतीश वारजुकर 526 मतांनी आघाडीवर

तुमसर विधानसभा

अजित पवार गटाचे राजू कारेमोरे हे पाचव्या फेरी अखेरीस 13127 मतांनी आघाडीवर

वाशिम मतदारसंघ

भाजपाचे श्याम खोडे 7809 मतांनी आघाडीवर

साकोली मतदारसंघ

साकोली मतदार संघातून काँग्रेसचे नाना पटोले केवळ 368 मतांनी आघाडीवर

ब्रम्हपुरी मतदारसंघ

विजय वड्डेटीवार 391 मतांनी आघाडीवर

अमरावती जिल्हात दिग्गजांना धक्का

काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर व माजी मंत्री बच्चू कडू पिछाडीवर

अचलपूर मतदार संघात प्रहारचे बच्चू कडू 20000 मतांनी पिछाडीवर भाजपचे प्रवीण तायडे आघाडीवर.

तिवसा मतदार संघ चौथ्या फेरी अखेर यशोमती ठाकूर 4500 मतांनी पिछाडीवर भाजपचे राजेश वानखेडे आघाडीवर.

धामणगाव भाजपचे प्रताप अडसळ 7960 मतांनी आघाडीवर.

दर्यापूर महाविकास आघाडीचे गजानन लवटे 6674 मतांनी आघाडीवर

अमरावती पंधरावी फेरी अखेर आझाद समाज पार्टीचे अलीम पटेल 13000 मतांनी आघाडीवर. महायुतीच्या सुलभा खोडके पिछाडीवर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT