राष्ट्रवादीचा सोलापुरात सर्व्हे  
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

 सोलापुरात बंडखोरीची डोकेदुखी

पुढारी वृत्तसेवा

संजय पाठक

सोलापूर शहर, जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष व त्यांचे इच्छुक दमदारपणे तयारीला लागले आहेत. राजकीय पक्षांना बंडखोरीची भीती सतावतेय, तर इच्छुकांना उमेदवारी डावलण्याची. अशा पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघांतील मतदार मात्र संभ्रमावस्थेत आहे.लढाई होणार आहे.

काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस त्यातही ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील एकसंघ राष्ट्रवादी काँग्रसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यास मध्यंतरी भारतीय जनता पार्टीने त्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरंग लावला. तेव्हापासून सोलापूर जिल्हा हा महायुतीचा गणला जाऊ लागला. विविधअधिकार पदांचे वाटप, कारखान्यांना मोठी मदत विकास निधीसाठी मोकळा सोडलेला हात अशा काही युक्ती करून फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यावर चांगलीच पकड़ बसवली, परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसची शकलं पडल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यावर विशेष लक्ष देत गाठिकाणचे दुरावलेले जुने शिलेदार पुना जोडून घेण्यास सुरुवात केली. त्यातून आजमितीला शरद पवारांकडे व पर्यायाने महाविकास आघाडीकडे मोठी ताकद जमा झाली. जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे जनमतही आपल्या बाजूने वळल्याची वातावरण निर्मिती करण्यात शरद पवार यांना यश आले. यामुळे या पक्षाकडे कार्यकत्यांची गर्दी तर आहेच, त्याशिवाय त्यांच्या पक्षातून उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुकांची संख्याही कमी नाही.

इच्छुक प्रत्येकाची इच्छा पुरी करणे शक्य नसल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीत बंडखोरीचे पीक फोपावण्याची शक्यता सध्यातरी दिसत आहे. दुसऱ्या बाजूला महायुतीच्या घटक पक्षातही याहून फारसे वेगळे वातावरण नाही. याठिकाणी विद्यमान लोकप्रतिनिधी इच्छुक आहेत तसे त्याठिकाणचे दुसन्या फळीतील मातब्बरही निवडणूक तयारीला लागले आहेत. या दोघांपैकी ज्याला उमेदवारी मिळणार नाही तो नक्कीच बंडखोरीच्या पवित्र्यात असणार. अशा बंडखोरीच्या पवित्र्यात असणाऱ्यांना शरद पवार यांनी आतापासूनच हेरले असून अशांना चुचकारण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. यामुळे महाकिकास आघाडीसारखीच महायुतीच्या घटक पक्षांनाही बंडखोरीची डोकेदुखी होऊ शकते असे सध्याचे चित्र आहे.

या मतदारसंघांत होऊ शकते बंडखोरी

सोलापूर शहर उत्तर: याठिकाणी भाजपाच्या विद्यमान आमदारांविरुद्ध पक्षामध्ये मोठी खदखद आहे. अशा असंतुष्टांनी नुकताच मेळावाही घेतला.

• दक्षिण सोलापूर : याठिकाणी विद्यमान आमदार भाजपचे आहेत. परंतु याठिकाणी , महाविकास आघाडीकडून अनेक मातब्बर इच्छुक आहेत. एकाला उमेदवारी मिळाल्यररावर बाकीचे शांत राहातील अशी सद्यस्थिती नाही. पंढरपूर-मंगळवेढा : पाठिकाणी विद्यमान आमदार भाजपाचे आहेत. परंतु याठिकाणी त्यांच्या मातब्बर नेते बंडाचे

सोलापूर जिल्हा विरुद्ध त्यांच्याच पक्षातील अन्य निशाण फडकवण्याच्या मनः स्थितीत असल्याचे सध्यातरी दिसते.

सांगोला याठिकाणी विद्यमान आमदार मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत. त्यांच्याविरुद्ध अजित पवार राष्ट्रचादीतून शरद पचार राष्ट्रवादीत आलेले माजी आमदार दीपक साळुंखे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, परंतु याठिकाणी शेतकरी कामगार पक्षाची मोती ताकद आहे. येथील दीर्घकाळ आमदार राहिलेले (कै.) गणपतराव देशमुख यांच्या दोन्ही नातवांमध्ये उमेदवारीसाठी संघर्ष सुरू आहे. या दोघांपैकी कुणालाही उमेदवारी मिळाली तरी दुसरा बंडखोरीच्या पकियात आहे. अर्थात याचा फटका महाविकास आघाडीस बसू शकतो.

माढा या मतदारसंघात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे, त्यांना त्यांचेच चुलत बंधू धनराज यांचा सामना करावा लागू शकतो. कारण धनराज यांना शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवारी देऊ शकतो. परंतु ऐनवेळी जर रणजितसिंह शिंदे है शारद पवार राष्ट्रवादी किंवा अपक्षही लवू शकतात. यापैकी काहीही झाले तरी प्रसंगी बंडखोरी करत धनराज हे निवडणूक लडू शकतात, असे चित्र आहे.

मोहोळ : विविध पक्षांतील इच्छुकांची मोठी संख्या हीच या मतदारसंघातील डोकेदुखी आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक इच्छुक असल्याचे सध्याचे चित्र असून बंडखोरीही याच पक्षात उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी प्राथमिक स्थिती आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT