पुढारी ऑनलाईन डेस्क : जनतेने महायुतीला विजय मिळवून दिला आहे. त्याबद्दल मी जनतेचे आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रातील हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यामध्ये जे एकत्रितपणे काम केले. त्यामुळे हा विजय शक्य झाला आहे. अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष लाभाचे राजकारण या दोन्हींचा समतोल महायुतीच्या सरकारने योग्य ठेवला. त्यामुळे लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून भरगोस मतांनी निवडून दिले आहे. अशी प्रतिक्रिया भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी दिली.
दरम्यान, निवडणुकीच्या आयोगाच्या आकडेवारीनुसार महायुतीने २१७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीने ५१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतरांनी २० जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान, राज्यात महायुतीने सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे.