ठाणे : पुढारी ऑनलाइन डेस्क - ठाणे शहर मतदार संघातून विधानसभा निवडणूक 2024 ठाण्यातील उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी जिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
आजचा दिवस हा गुरुपुष्यामृत (Gurupushyamrut yoga) योग असा महत्वाचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी आपला उमेदवारी अर्ज भरण्यास दिग्गजांनी सुरूवात केली आहे. राजकीय पक्षांनी आपआपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली असल्याने या महत्वपूर्ण मुहूर्तावर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनेकजण सरसावले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन करत प्रत्येकजण आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्नात आहेत.
जोरदार शक्तिप्रदर्शन करत समर्थकांच्या विजयी घोषणेच्या जल्लोषात ठाकरे शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात असताना सोबत नरेश मणेरा आणि केदार दिघे यांच्यासह समर्थक, प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत.
याच ठाणे शहर मतदारसंघातून मनसेचे अविनाश जाधव हे देखील आजच गुरुपुष्यामृत दिनी गुरुवार (दि.24) अर्ज दाखल करणार आहेत तर यावेळी त्यांच्यासोबत पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित राहणार असल्याचे समजते.