Maharashtra assembly election 2024 Pudhari News Netwrok
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Thane Maharashtra Elections 2024 Voting : या दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अंजली राऊत

Thane : पुढारी ऑनलाइन डेस्क - राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. सकाळी 7 पासून मतदानाला सुरूवात झाली असून संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहेत. राज्यात एकूण 4 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघामध्ये 244 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. यामध्ये 2014 व 2019 मध्ये विधानसभा निवडणुक लढविलेल्या जुन्याच चेहऱ्यांना राजकीय पक्षांनी पुन्हा संधी दिली आहे. तर यंदा महायुती विरुद्ध महाआघाडी असा सामना रंगणार असून मतदार कोणाच्या पारड्यात कौल टाकतात याकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत.

ठाणे विधानसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार आमदार संजय केळकर यांनी तीन हात नाका वन विभाग कार्यालयात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
डोंबिवली विधानसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली पूर्वेतील स . वा. जोशी महाविद्यालयात आपल्या सहकुटुंबा सह मतदानाचा हक्क बजावला.
मुरबाड विधानसभा क्षेत्राचे महायुती भाजपाचे उमेदवार किसन कथोरे यांनी पत्नीसह बदलापूर जवळील सागाव येथे मतदानाचा हक्क बजावला.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी पत्नी स्मिता यांच्यासह कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी कोपरी पाचपाखडी येथील मतदान केंद्र क्र 338 येथे मतदान केले.
मनसेचे उमेदवार प्रमोद (राजू) पाटील यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.

मनसेचे उमेदवार राजू पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

डोंबिवली : मनसेचे नेते तथा कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी बुधवारी (दि.20) सकाळी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.

त्यांच्या पत्नी योगिता आणि पुत्र आदित्य यांनीही काटई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मतदान करणे प्रत्येकाचा हक्क आणि ते राष्ट्रीय कर्तव्य आहे. आपले अमूल्य मत वाया जाता कामा नये, यासाठी प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन राजू पाटील यांनी यावेळी पुढारी सोबत बोलताना केले.

कल्याण ग्रामीण मतदार संघाचे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आरपीआय महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजेश मोरे यांनी बजावला मतदानाचा हक्क

डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार राजेश मोरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मोरे हे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, आरपीआय महायुतीचे उमेदवार आहेत.

राजेश मोरे यांनी सकाळी बालाजी मंदिरात सहकुटुंब दर्शन घेतल्यानंतर पश्चिम डोंबिवलीच्या मोठागाव येथील केडीएमसीच्या मराठी शाळेत मतदान केले. मतदान हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाने दिलेला महत्त्वाचा अधिकार आहे. हा अधिकार सर्वांनी बजावला पाहिजे. मी संपूर्ण कुटुंबासह मतदान केले, तुम्हीही करा, असे आवाहन मोरे यांनी पुढारी सोबत बोलताना केले.

कल्याण पश्चिम विधान सभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार आमदार विश्वनाथ भोईर यांनी उंबर्डे येथील जागृती माध्यमिक विद्यालय येथे आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या सह भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार हे देखील उपस्थित होते
मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी पत्नी सोनाली यांच्यासह ठाण्यातील सरस्वती स्कूल पाचपाखाडी येथे विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला.
उबाठा सेनेचे उमेदवार राजन विचारे आणि पत्नी नंदिनी यांनी सेंट जॉन द बॅप्टिस्ट स्कूल ठाणे येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांचा परीवार सोबत होता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT