सापाड : विधानसभा निवडणुकीत व्होट जिहादचा नारा देत धर्म आणि जातीच्या नावावर समाज विभागण्याचा प्रयत्न विरोधकाकडून केला जात आहे. मात्र विरोधकांना यात यशस्वी होऊ देऊ नका तर राज्याच्या विकासासाठी भाजपाला मतदान करा, असे आवाहन कल्याण पूर्वेत स्मृती इराणी यांनी केले.
142 कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुलभाताई गणपत गायकवाड यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी मोदी सरकारने मागील पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा पाढा वाचत विरोधकांवर निशाणा साधला.
मोदी सरकारने जम्मू काश्मीरमधील 370 कलम रद्द केल्याने तिथल्या मुलीना त्यांचा वारसा हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून आदिवासींना आरक्षणाचा तर मुलांचे संरक्षण करण्यासाठीचे अधिकार मिळाले आहेत. यामुळे 370 कलम पुन्हा कधीही लागू होणार नसल्याचे त्या म्हणाल्या. तर विरोधकांना रीजेक्शनचे इंजेक्शन द्या!आणि कल्याण पूर्वेच्या विकासासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. तर काँग्रेस व त्यांचे इतर मित्र पक्ष कायमच जनतेच्या हितापेक्षा स्वताच्या हितासाठीच राजकारण करत असल्याचा हल्लाबोल करत आम्ही जे जे बोललो ते ते करून दाखवलं असा टोला देत विरोधकांचे तोंड बंद केले. तर नरेंद्र मोदीच्या सत्तेत महिलांना 33% च्या आरक्षण लागू करण्यात आल्यानंतर देशात नवीन इतिहास रचला गेला. जनधन योजना, मुद्रा योजना, लाडली बहीण योजना अंतर्गत महिलांना सन्मान देण्यात आला. एवढेच नव्हे तर नरेंद्र मोदी यांनी आपल्या सत्तेत सर्वसामान्य गरीब महिलेला सन्मानाचे स्थान दिले असल्याचे सांगत द्रौपदी मुर्म यांना राष्ट्रपती पदावर विराजमान केले. त्यामुळे सुलभा गायकवाड ह्या फक्त महिलांच्या ताकतीने प्रतीकच नसून लोकतंत्राचे प्रतीक असल्याचे सांगत स्मृती इराणी यांनी भाजपाला मात म्हणजे विकासाला मात देण्याचे आवाहन केले. तर विरोधकांनी राम मंदिर वर केलेले भाजपची कोंडी सत्तेत आल्यानंतर भाजपाने केलेली राम मंदिरची उभारणी करून स्मृती इराणी यांनी विरोधकांची बोलती बंद केली. प्रत्येक व्यक्ती जसा दिवाळी ची वाट बघत असतो तसा 500 वर्ष रामाने आपल्या मंदिराची वाट पाहिली ती राममंदिर बांधून भाजपा सरकारने पूर्ण करून दाखवली.
लव जिहाद वरून स्मृती इराणी यांनी विरोधकांवर कोंडीत पकडून जाती धर्माच्या नावावरून लोकांना फोडण्याचे प्रयत्न केला जात आहे.त्यांना नागरिक 2024 मध्ये जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. तर कोविड काळात भारतीयांनी बनवलेल्या वॅक्सिनवरून स्मृती इराणी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत वॅक्सिन दिल्याचे सांगत काँग्रेसच्या सरकारने नागरिकांना मोफत वॅक्सिन दिले असते का, असा प्रश्न उपस्थितांना केला. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर शेतकर्यांना अनेक योजनांचा फायदा करून दिला असल्याचे स्मृती इराणी यांनी सांगितले. दहा करोड शेतकर्यांच्या बँकेत पैसे पोहोचवण्याचा दावा करत स्मृती इराणी यांनी महाराष्ट्रात शेतकर्यांच्या आत्महत्या कमी झाल्याचे देखील सांगितले.