वडीगोद्रीः प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार उभा राहील यासाठी आज बैठक झाली.एकच उमेदवार मतदार संघात निश्चित केला जाईल, उमेदवार निश्चित झाल्यानंतर ईतर इच्छुकांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावे.आज उमेदवार जाहीर करणार नाही.२९ -३० तारखेला आमचे उमेदवार जाहीर करू असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.अंतरवाली सराटी येथे इच्छुक उमेदवारांच्या बैठकीपूर्वीचे पत्रकारांचे संवाद साधत होते.
निवडणुकीसाठी जातीय समीकरण जुळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे मराठा ओबीसी कोणताही वाद नाही तो वाद फक्त येवल्यावल्याने लावला.जातीय समिकरण ठरल्यानंतर मि दौरे करणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली एकाच जातीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवता येणार नाही. सर्वांना सोबत घेऊन राजकीय समिकरण जुळवणार समिकरण जुळले की कोणत्या मतदारसंघात उमेदवारी जाहीर करायची हे जाहीर करणार असल्याचे सांगितले काही ठिकाणी लढ्याचे ठरलं तर काही ठिकाणी तेथील उमेदवार पाहून उमेदवाराला बळ देवुन पाडापाडी करणार आहोत.
मतदारसंघात बैठक घेऊन सर्वानुमते एक उमेदवार ठरविण्यासाठी सांगितले होते. परंतु ते काही जुळले नसल्याने आज बैठक बोलावली असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. राजकारणाच्या हट्टापायी समाजाची नुकसान होणार नाही काळजी घेवू.आता तर आपण जागलो तर पाच वर्षे आम्हाला न्याय मिळेल, शेतकरी गोरगरीब कष्टकरी प्रश्न मार्गी लागणार आहे.