आमदार किशोर जोरगेवार,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे Pudhari File Photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपच्या संपर्कात: बावनकुळेचा दावा

Maharashtra Assembly Poll | जोरगेवारांच्या प्रवेशाला प्रतिभा धानोरकर, सुधीर मुनगंटीवार यांचा विरोध

पुढारी वृत्तसेवा

नागपूरः चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपाच्या संपर्कात आहेत. अपक्ष असल्याने ते सर्वांच्याच भेटीगाठी घेत आहेत. मात्र, जिल्हाचे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार हे त्यांच्याशी समन्वय साधून योग्य निर्णय होईल असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे जोरगेवार यांच्या प्रवेशाला काँग्रेसमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तर भाजपमध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे बोलत होते.

नवाब मलिक यांच्याबाबत निर्णय अजित पवारच घेतील

नवाब मलिक यांच्याबाबत निर्णय अजित पवारच घेतील. आमची चर्चा झाली.आमदार रवी राणा हे त्यांच्याच युवा स्वाभिमान पक्षात राहतील. नागपुरातील उमेदवार घोषणा रखडली असली ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नागपुरात कोणतीही जागा मागितली नाही असे बावनकुळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT