मुंबईः राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट पक्षाने विधानासभेसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये २२ उमेदवारांचा समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही उमेदवारांची नावे जाहीर केली. पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादीने ४५ उमेदवारांना संधी दिली होती.
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आज जाहीर झाालेल्यामध्ये इचलकरंजीतून मदन कारंडे, चंदगडमधून नंदिनी बाभूळकर यांना तर अहिल्यानगर (नगर) येथून अभिषेक कळमकर, अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांना संधी दिली आहे. बीडमधून संदीप क्षीरसागर यांचे नाव जाहीर झाले आहे. राष्ट्रवादीकडून आतापर्यंत ६७ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी जाहीर केलेल्या सर्व जागांवर आपले उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच आता महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत बैठका होणार नाहीत तर फोनवरुन चर्चा केली जाईल, असेही स्पष्ट केले. तसेच तिन्ही पक्ष समान ९० -९० -९० जागा लढणार आहोत असून केवळ २ ते ३ जागा कमी -जास्त होऊ शकतात ,असे त्यांनी स्पष्ट केले.