Maharashtra Assembly Polls |
मध्य नागपुरात अतिरिक्त ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनावर दगडफेक केल्याची घटना घडली. File Photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

नागपूर : ईव्हीएम नेणाऱ्या वाहनाची तोडफोड

Maharashtra Assembly Polls | बंटी शेळकेसह २० जणांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : विधानसभा निवडणूक मतदानानंतर मध्य नागपुरात महाल परिसरात अतिरिक्त ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनावर दगडफेक करून कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्यासह 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर भडकत चौक, कोतवाली महल, झेंडा चौक परिसरात बराच काळ तणाव निर्माण झाला होता. रात्री उशिरापर्यंत परिस्थिती तणावपूर्ण मात्र नियंत्रणात होती. मतदान केंद्रावरून ईव्हीएम नेत असताना कार्यकर्त्यांनी गैरसमजातून गाडी अडवली. त्यावेळी भाजप व काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर आले. झालेल्या दगडफेकीत तणाव वाढला. काँग्रेसचे काही कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतल्याने कोतवाली पोलिस स्टेशनसमोर जमाव गोळा झाला. महाल, बडकस चौकात भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.