मुंबई : मनसे उमेदवारांच्या यादीवर शेवटचा हात फिरविण्याचे काम सुरू आहे. दुसरी यादी आज-उद्या जाहीर होईलच. तत्पूर्वी ठाण्यातून अविनाश जाधव, तर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे नेते तथा विद्यमान आमदार राजू पाटील यांना उमेदवारी आपण जाहीर करत आहोत, अशी घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी डोंबिवलीत केली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदारांना संपर्क साधता यावा, याकरिता कल्याण-शीळ महामार्गावर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात निवडणूक मध्यवर्ती कार्यालय उभारण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. मनसेची दुसरी यादी लवकरच जाहीर होईल. अविनाश जाधव आणि राजू पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना आपण स्वतः हजर राहणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बाळा नांदगावकर-शिवडी (मुंबई),
दिलीप धोत्रे - पंढरपूर
लातूर ग्रामीण-संतोष नागरगोजे
हिंगोली - बंडू कुटे
चंद्रपूर - मनदीप रोडे
राजुरा - सचिन भोयर
यवतमाळ - राजू उंबरकर
ठाणे - अविनाश जाधव
कल्याण-डोंबिवली - राजू पाटील