नवी दिल्ली :
शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून अर्ज दाखल करणे सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सुनावणीला महत्व आहे.
गेल्या काही दिवसात आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी झालेली नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी नक्की कधी होते, निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी सुनावणी होणार का, याकडे राजकीय पक्षांसह राज्यातील जनतेची नजर आहे. गुरुवारी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ३३ आणि ३३.१ या क्रमांकावर आमदार अपात्रता प्रकरण सूचीबद्ध करण्यात आले आहे.
दरम्यान, सप्टेंबर महिन्यात हे प्रकरण ८ वेळा तर ऑक्टोबर ३ वेळा न्यायालयात सूचीबद्ध करण्यात आले होते. मात्र, एकाही दिवशी यावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे गुरुवारी तरी सुनावणीला मुहूर्त मिळेल का हे पाहणे महत्त्वाचे आहे