मनोज जरांगे यांची तपासणी करताना डॉक्‍टर Pudhari Photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

मनोज जरांगे यांची अचानक तब्येत बिघडली

Maharashtra Assembly Poll |बैठका आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींमुळे दगदग

Namdeo Gharal

वडीगोद्रीः मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची आज अचानक तब्येत बिघडली आहे. मागच्या काही दिवसांपासून जरांगे सलग मराठा समाजाच्या बैठका आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. त्‍यामुळे २४-२४ तास मराठा आंदोलकांची अंतरवालीत गर्दी आहे. त्यामुळं जरांगे यांची झोप पूर्ण होत नाही.

जरांगे यांना अशक्‍तपणा आणि थकवा

त्यामुळे आज अचानक त्यांची तब्येत बिघडली असून अंगदुखी अशक्तपणा आणि थकवा जाणवू लागला आहे, त्याचबरोबर तापही त्यांना आलेला आहे.. डॉक्टरांनी जरांगे यांची तपासणी करून आराम करायचा सल्ला दिला आहे. मनोज जरांगे यांच्यावर आता अंतरवालीतंच उपचार सुरू करण्यात आले असून त्यांना सलाईन लावण्यात आल आहे. मनोज जरांगे यांना व्हायरलचा त्रास होत असल्याचे डॉ विनोद चावरे यांनी म्हटलं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT