पुढारी ऑनलाईन डेस्क - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. २२ ऑक्टोबरला अधिसूचना जारी होणार आहे. २९ तारखेला अर्ज भरणे शेवटची तारीख, ३० ऑक्टोबरला अर्जाची छाननी, ४ नोव्हेंबर तारखेला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. महाराष्ट्रातील निवडणुकांची घोषणा निवडणूक आय़ोगाच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. एकाच टप्प्यात ही निवडणूक होईल.
शहरी मतदारांची मतदान करण्याची प्रवृत्ती पाहता आम्ही आवाहन करतो की, अधिकाधिक संख्येत मतदान करावे, शहरी भागांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे आणि इतर शहरांप्रमाणेच राज्याच्या सरासरीपेक्षा मतदानाची टक्केवारी खूपच कमी आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आम्ही पालिका आयुक्त आणि डीओसोबत विशेष बैठक घेणार आहोत.मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार
एकूण मतदार - ९ कोटी ५९ लाख
पुरुष मतदार - ४ कोटी ५९ लाख
महिला मतदार - ४ कोटी ६४ लाख
यंदा १९ लाख ४८ हजार नव्या मतदारांची नोंद झाली आहे तर ६ हजार तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे. तसेच ८५ वर्षांपुढील मतदार एकूण १२ लाख ४८ हजार आहेत. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. २९ एससी राखीव मतदारसंघ आहेत. २५ एसटी राखीव मतदारसंघ आहेत. ९.६३ कोटी मतदार महाराष्ट्रात असल्याची माहिती देण्यात आली आहे. १ लाख ८६ हजार मतदार केंद्रे असणार आहेत. आजपासून ३५ दिवसात मतदान होणार आहे.