जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी ही निवडणूक : नितीन गडकरी  pudhari photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Maharashtra Assembly Poll :'जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी ही निवडणूक'

जनता अन् मतदारसंघासाठी निष्ठेने काम करणाऱ्या आ. अभिमन्यूच्या पाठीशी रहा : नितीन गडकरी

पुढारी वृत्तसेवा

लातूर, पुढारी वृत्तसेवा: राजकारणात जनता मालक तर लोकप्रतिनिधी सेवक असते. म्हणूनच आपण लोकसेवा करायची, जनतेचे जगणे सुसहा करायचे, येथील आर्थिकक व सामाजिक परिस्थिती बदलायची, गाव, गरिव, मजूर, शेतकयांचे कल्याण करायचे याची जापल्या सदासर्वदा जाणीव ठेवत जनकल्याणासाठी घोदगान देणारा संवेदनशील कार्यकर्ता म्हणून अभिमन्यू पवारांचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे त्याचा मला आनंद व अभिमानही आहे. ही निवडणूक अभिमन्यू पवार यांच्या भविण्याचा फैसला करणारी नसून खाया अथनि येथील जनतेच्या भविष्याच्या फैसला करणारी आहे. जनता अन मतदारसंघासाठी निष्ठेने काम करणान्या आ. अभिमन्यूच्या पाठिशी रहा, असे आवाहन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी (दि.१२) फिल्लारी येथे केले.

महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर आ. अभिमन्यू पवार, माजीमंत्री बसवराज पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, सुरेश बिराजदार, लक्ष्मणा भोसले, संताजी चालुक्य, किरण उटगेमुक्तेश्वर वाघदरे, संतोषप्या मुक्ता, सुभाष जाधव, सुनील उटगे, ज्ञानेश्वर वाकडे, दशाश्य कोळपे, सभापती वामन, उपसभापती भिमाशंकर राबट्टे, सुधीर पोतदार, सरपंच सुलक्षणा बाबळसुरे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले राजकारणात जनतेच्या समस्याची जाण व ते सोडवण्याचे तंत्र अवगत असणे महत्वाचे असते. आमदार माणून अभिमन्यू पवार यांनी उत्कृष्ट काम केले आहे. त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला आहे. आपला आमदार अभिनन्यू पवार हा उत्तम कार्यकर्ता सर्व सामान्यांशी उत्तम संबंध जोडणारा पाणंद रस्त्यापासून हायवे पर्यंत, जलसंधारण पासून विकासाच्या प्रत्येक मुद्यावर अध्यापन करून जास्तीत जास्त विषयावर कसे काम करता येईल याकरिता सातत्याने काम करणारा आहे. सर्व चांगल्या लोकप्रतिनिधी मध्ये अभिमन्यू पवार यांनी नाच कमवले आहे याचा मला आनंद आहे.

निवडणूकीत तुम्हाला तुमचे चांगले भविष्य घडविणारा उमेदवार मिळाला तरच तुमचे भविष्य बदलू शकते. वी पार्टी व जो नेता तुमचे भविष्य बदलू तो अभिमन्यू च्या रुपाने उभा आहे आणि तुम्ही चांगल्या उमेदवाराच्या मागे उभे राहिलात तर या भागाचे चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला देण्यासाठी आलो आहे असे गडकरी म्हणाले.

भरीव निधी देणार

आ. अभिमन्यू पवार यांनी आपल्या भाषणात औजाच्या विकासासाठी भरीव निधीची मागणी केली होती. तो चागा पकडत गडकरी यांनी अभिमन्यू निवडून आल्यावर तुम्हाला औशाच्या विकासासाठी शेकडी नाहीतर हजारो कोटीचा निधी देतो. बायपास काय राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी लागेल तेवहा निधी देतो असे आश्वासनही यावेळी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT