धाराशिव : जिल्ह्यात विधानसभेच्या चार जागांसाठी ६६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. ९८ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर चारही मतदारसंघांतील चित्र स्पष्ट झाले आहे. सर्वच ठिकाणी महाविकास आघाडी विरुध्द महायुती अशा सरळ लढती होणार आहेत.
उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवार रिंगणात आहेत. येथून ३१ जणांनी माघार घेतली. येथे ठाकरे शिवसेनेचे आ. कैलास पाटील यांचा थेट सामना शिवसेनेचे (शिंदे) अजित पिंगळे यांच्याशी होणार आहे. परंडा मतदारसंघात २१ उमेदवार रिंगणात असून २१ जणांनी माघार घेतली आहे. येथे शिंदे सेनेचे पालकमंत्री तानाजी सावंत यांचा सामना तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले राष्ट्रवादीचे (शरद पवार) उमेदवार राहुल मोटे यांच्याशी होणार आहे.
तुळजापूर मतदारसंघातून भाजपचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांची थेट लढत काँग्रेसचे उमेदवार अॅड. धीरज पाटील यांच्याही होणार आहे. येथून माजी आ. मधुकरराव चव्हाण, अशोक जगदाळे, अॅड. व्यंकट गुंड, संजय निंबाळकर, जीवनराव गोरे आदींनी माघार घेतली. येथून २३ उमेदवार रिंगणात आहेत. तर उमरगा मतदारसंघातून १८ जणांनी माघार घेतली असून १० जण रिंगणात आहेत. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात हॅटट्रीक केलेले शिंदे सेनेचे उमेदवार आ. ज्ञानराज चौगुले यांची लढत ठाकरे से- नेचे उमेदवार प्रवीण स्वामी यांच्याशी होणार आहे.
Dharashiv, 66 Candidates, Election 2024, Political Candidates, Maharashtra Politics, Election Race, Political Landscape, Maharashtra Elections, Election News, Dharashiv Election