चार दिवसांत उमेदवारांची नावे जाहीर करणार : जरांगे Pudhari Photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Maharashtra Assembly Poll: चार दिवसांत उमेदवारांची नावे जाहीर करणार : जरांगे

चार दिवसांत उमेदवारांची नावे जाहीर करणार : जरांगे

अनुराधा कोरवी

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : चार दिवसांत आम्ही सगळे उमेदवार डिक्लेअर करू कोणत्या मतदारसंघात लढायचे? एससी, एसटीला कुठे पाठिंबा द्यायचा? हे आम्ही ठरवणार आहोत. जिथे आम्ही निवडणूक लढणार नाहीत तिथे कोणाला पाठिंबा द्यायचा हे आम्ही आगोदर वॉण्ड घेऊन ठरवणार आहोत. आमचे ठरले आहे. यावेळी आम्ही लढणार आहोत, पाडणार आहोत आणि जिरवणारही आहोत, असे मनोज जरांगे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. ( Maharashtra Assembly Poll )

सगळ्यांनी अर्ज भरू नका

आम्ही काल बोलताना म्हटलो की, सगळ्यांनी अर्ज भरून घ्या, पण सगळ्यांनी भरू नका. तालुक्याच्या ठिकाणी बैठक घ्या. या बैठकीत दोन ते तीन जणांची निवडा करा आणि त्यांनीच अर्ज भरा. ज्या दिवशी एक नाव डिक्लेअर होईल, त्यावेळेस बाकीच्यांनी अर्ज काढू घ्या, फक्त एक अर्ज ठेवा, असे जरांगे सोमवारी म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की एसटी, एससी उमेदवार आपण देणार नाहीत. जे आमच्या मागण्यांबाबत सहमत आहेत, त्यांच्याकडून बॉण्ड घ्यायचा. पण त्याचा उलटा खेळ झाला. बॉण्ड म्हटले की कोणीही बॉण्ड देत आहेत. आम्हाला काय तुम्हाला खर्चात पाडायचे नाही. आम्ही तुमच्या मागण्यांशी सहमत आहोत हे आधी आम्हाला विचारा आणि नंतर बॉण्ड द्या. मी व्यासपीठाच्या खाली आलो की तातडीने एका जणाने बॉण्ड दिला, पण तुमच मिरीटही बघावे लागणार आहे.

चार दिवस कोणीही माझ्याकडे येऊ नका

एका मतदारसंघातून पन्नास शंभर बॉण्ड आले तर उगाच खर्च. त्यामुळे बॉण्ड देण्यापूर्वी आम्हाला एकदा विचारा, जिथे आम्ही लढणार नाही तिथला हा विषय आहे. अंतरवालीकडे चार दिवस कोणीही येऊ नका. फोटो काढण्यासाठी फक्त इकडे येऊ नका. मला आता ३५ दिवस मोकळे सोडा, असे ते म्हणाले.

एससी, एसटी कोणत्याही पक्षाचा असो ज्यांना आमची मागणी मान्य आहे, त्यांनी बॉण्ड द्यायचा. जर बॉण्ड आला नाही तर आम्ही अपक्ष उमेदवार उभा करू. जर ओबीसी उमेदवाराला आमच्या मागण्या मान्य असतील आणि त्याने बॉण्ड दिला तर आम्ही त्यालाही पाठिंबा देऊन निवडून आणू, असे ते म्हणाले. ( Maharashtra Assembly Poll )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT