छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विधानसभेसाठी छत्रपती संभाजीनर ग्रामीण, जालना, बीड आणि धाराशिव या चार जिल्ह्यांतील २१ मतदारसंघांत बुधवारी (दि.२०) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. भयमुक्त आणि निर्विघ्न मतदान प्रक्रियेसाठी १ हजार ३८२ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह १६ हजारांहून अधिक पोलिस, केंद्रीय सशत्र दलाच्या २७ तुकड्या असा मोठा बंदोबस्त नेमण्यात असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी दिली.
१५ ऑक्टोबरला निवडणूक आचारसंहिता लागू होताच आयजी मिश्र यांनी छत्रपती संभाजीनगरचे पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, बीडचे अविनाश बारगळ, जालन्याचे अजयकुमार बन्नाल, धाराशिवचे संजय जाधव यांना कारवायांचे आदेश दिले. त्यांनी अवैध धंद्यांवर कारवाया करीत प्रतिबंधात्मक कारवायांचाही जोर वाढविला. धाराशिव जिल्ह्याला ६४ कि.मी. एवढी कर्नाटक राज्याची सीमा अहे. तेथे ४ चेक पोस्ट लावल्या असून साडेचार हजार लिटर दारू, दोन हजार किलो गुटखा, असा २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून ३६ किलो अमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत.
याशिवाय, वाहतूक शाखेने २३ हजार वाहनांवर कारवाई करीत २.३ कोटींचा दंड बसूल केला. तसेच, अचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्याांचर ४३ गुन्हे दाखल केले. नाकाबंदीत ५ कोटींची रोकड आणि ९० कोटीचे सोने, चांदी जप्त केली. ३ कोटीचे २८ किंटल अमली पदार्थ जप्त करून ४२ गुन्हे नोंदविले. २ कोटींचा साडेबारा हजार किलो गुटखा जप्त करून ८४ गुन्हे दाखल केले. १.९ कोटींची अडीच लाख लिटर दारू जप्त करून दीड हजार गुन्हे दाखल केले.
या जिल्ह्यांमध्ये २० गावठी कट्टे, १०४ तलवार, चाकू जप्त केले असून ९७ गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय, १२ कुख्यात गुन्हेगारांवर एमपीडीएनुसार कारवाई करून त्यांना विविध जेलमध्ये स्थानबद्ध केले आहे रेकॉर्डवरील ८४ आरोपीना वेगवेगळ्या जिल्ह्यातून हद्दपार केले आहेत. ४२९ वॉटेड आणि ३० फरारी आरोपींना गेल्या महिनाभरात पकडले.
७ हजार ७९१ मतदान केंद्र
छत्रपती संभाजीनर ग्रामीण, जालना, बीड आणि धाराशिव या चार जिल्ह्यांत ८८ पोलिस ठाणे, ४३८९ गावे, २१ विधानसभा मतदारसंघ, ७ हजार ७११ मतदान केंद्र आणि २१ मतमोजणी केंद्र आहेत.
विशेष पोलिस महानिरीक्षक मिश्र यांच्या नेतृत्वात ४ पोलिस अधीक्षक, ५ अपर अधीक्षक, २० उपअधीक्षक, ९९ पोलिस निरीक्षक, ५६८ सहायक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, साडेआठ हजार पोलिस अंमलदार, ६ हजार ३५० होमगार्ड, असा तगड़ा बंदोबस्त आहे. बीएसएफच्या ८, सीआरपीएफ ५. आरपीएफ २, एसएसबी २, एसआरपीएफ ४ आणि एसआरपीएफ केरळच्या अशा २५ कंपन्या आल्या आहेत. त्यांनी ६५१ ठिकाणी रुट मार्च काढला आहे.
शहर पोलिसांना केरळ, राजस्थान, कर्नाटक, पंजाब या राज्यातून एसआरपीएफच्या तुकड्या आणि पोलिस अधिकारी मिळाले आहेत. तसेच केंद्रीय सशत्र पोलिस दल (सीएपीएफ), सीमा सुरक्षा बल, राज्य राखीव दल, केंद्रीय राखीव पोलिस दल, रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) अशा ८ सशस्त्र जवानांच्या तुकड्या शहरात दाखल झाल्या आहेत.
मतदान केंद्राभोवती शंभर मीटरच्या आत फक्त मतदारांना प्रवेश असेल, तसेच परिसरात पोलिस ठाणेनिहाय गस्त राहिल, भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथकांची नाकाबंदी व वाहन तपासणी केली जात आहे. नियंत्रण कक्षातून दर तासाला पथकांकडून आढावा घेतला जात आहे. मतदानानंतर क्यूआरटी व स्ट्रायकिंग फोर्सच्या बंदोबस्तात मईव्हीएमफरवाना होतील.