संसदेतील विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांच्या विधानसभेच्या प्रचारार्थ दोन सभा होणार आहेत. यामध्ये ते नागपूर आणि मुंबई येछे सहभागी होणार आहेत. दुपारी 12 वाजता नागपुरामध्ये सभा होणार आहे तर सायंकाळी मुंबई येथे महाविकास आघाडीच्या सभेमध्ये ते लोकांना संबोधित करणार आहेत.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस - आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आज (बुधवार) काळेवाडी फाटा, कस्पटे वस्ती येथील अँबियन्स हॉटेल शेजारील मैदानात सायंकाळी ६ वाजता होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांची ही पहिलीच प्रचार सभा होणार आहे.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात तीन ठिकाणी जाहीर सभा पार पडणार आहेत. अकोला, अमरावती, वाशिम या तीन जिल्ह्यांमध्ये त्यांच्या सभा पार पडणार आहेत. योगी यांची आज अकोल्यातील मुर्तिजापूर या ठिकाणी सहभागी होणार आहे. भाजप उमेदवार हरिष पिंपळे यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे.
मुंबईमध्ये माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी शरद पवारांचे कौतुक केले आहे. यावेळी ते बोलताना ते म्हणाले, जनता हे नेत्याने कधी निवृत्त व्हायचे ठरवते. . त्यांना राजकारणातील प्रदिर्घ अनुभव आहे. त्यांचा अनुभवाचा फायदा सर्व घटकपक्षांना होईल. त्यामुळे शरद पवार आमचे मार्गदर्शक आहेत. असे विधान त्यांनी केले.
मुंबईमध्ये या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या पाच गॅरंटी या सभेच्या माध्यमातून जाहीर करण्यात येणार आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा आज प्रकाशित केला जाणार आहे. या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे प्रमुख चेहरे असणार आहेत
वसईमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी 9 पिस्तूल आणि 21 जिवंत काडतूसं जप्त जप्त केली आहेत. वसई पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्रामध्ये आता प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची आज भिवंडीमध्ये प्रचारसभा होणार आहे. मंगळवारी (दि.5) कोल्हापूरामध्ये त्यांची तोफ धडाडली होती. त्यांनी महायुती सरकारवर जोरदार टिका केली.