जळगाव: महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे मतदान २० नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. यासाठी उमेदवारांनी आपआपल्या मतदार संघातील निवडणूकीसाठी अर्ज जमा केले आहेत.
उमेदवार आपला प्रचार करण्यासाठी मैदानात जोरदार तयारीनिशी उतरले आहेत. मात्र निवडणुकीवेळी पैशांचे अनेक गैरव्यवहार घडत असतात. त्यामुळे निवडणुकीत काळा पैसा वापरला जात असेल तर लवकरात लवकर प्राप्तिकर विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन उप आयकर निदेशक अनिल खडसे यांनी केले आहे.
परिपत्रकाद्वारे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ दरम्यान काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी प्राप्तिकर विभागाशी संपर्क साधून सहकार्य करावे असे आवाहन आयकर विभागातर्फे करण्यात आले आहे.
निवडणुकीत काळा पैसा वापरला जात असल्याची माहिती, रोख रकमेचे वाटप, रोख रकमेची हालचाल याबाबत विश्वसनीय माहिती देण्यास संकोच करू नये अशी विनंती करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे माहिती देणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवण्यात येणार आहे.
जर कुणाला काळा पैसा वापरला जात असल्याचे निर्दशनास आले तर येथे साधावा संपर्क टोल फ्री नंबर : 1800-233-0355, व्हॉट्सॲप क्रमांक : 9403390980
(छायाचित्रे, व्हिडिओ इत्यादी पाठविण्यासाठी)
किंवा
nagpur.addidit.inv@incometax.gov.in nashik.addidit.inv@incometax.gov.in
येथे ईमेल मेल करावा, असे आवाहन जनतेला करण्यात आले आहे.