प्रातिनिधिक छायाचित्र (file photo)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

भाजपकडून उमेदवारांची २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

Maharashtra Assembly Election 2024 :

पुढारी वृत्तसेवा

Maharashtra Assembly Election 2024 Live Updates : विधानसभा निवडणुकीसाठी शक्तीप्रदर्शन करत अर्ज भरण्याची उमेदवारांची लगबग सुरु आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यामुळे मित्र पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ लागली आहे. महाविकास आघाडीत काही मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत, तर काही जागांवर सांगली पॅटर्न राबविला जाण्याचे संकेत मिळत आहेत.

भाजपकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, यांना मिळाली संधी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून आज (दि.२६) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये पक्षाकडून २२ जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने जाहीर केलेल्या यादीत जत मतदारसंघातून गोपिचंद पडळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पंढरपूरमधून समाधान आवताडे तर शिराळामधून सत्यजित देशमुख यांना विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून संधी देण्यात आली आहे.

नवाब मलिक विधानसभा निवडणूक लढविण्‍यावर ठाम

राष्‍ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांनी आज (दि.२६) विधानसभा निवडणूक लढवण्‍याच्‍या निर्णयावर असल्‍याचे ठाम जाहीर केले आहे. ते समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांच्‍याविरोधात शिवाजीनगर- मानखुर्द मतदारसंधातून निवडूक लढविणार आहेत. २९ ऑक्‍टोबर रोजी अर्ज दाखल करणार असल्‍याचे वृत्त 'पुढारी न्‍यूज'ने दिले आहे. (maharashtra assembly election 2024)

राष्‍ट्रवादी शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची नावे जाहीर

राष्‍ट्रवादी शरदचंद्र पवार गट पक्षाने विधानासभेसाठी आपल्‍या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये २२ उमेदवारांचा समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये पहिल्‍या यादीमध्ये राष्‍ट्रवादीने ४५ उमेदवारांना संधी दिली होती.

ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणखी तीन उमेदवारांची यादी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने आणखी तीन अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. वर्सोवा येथून हरुन खान, घाटकोपर पश्चिममधून संजय भालेराव आणि विलेपार्ले येथून संदीप नाईक यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपकडून ४० स्टार प्रचारक, पीए मोदींचा समावेश

भाजपने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी ४० स्टार प्रचाराकांची यादी जाहीर केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री जे पी नड्डा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे.

काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

काँग्रेसने २३ उमेदवारांची दुसरी यादी आज शनिवारी जाहीर केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळमधून गणपतराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसने २३ उमेदवारांची दुसरी यादी आज शनिवारी जाहीर केली.

काँग्रेसची दुसरी यादी थोड्याच वेळात

महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी म्हटले आहे की, "महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी अर्ध्या तासात जाहीर केली जाईल. आज काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे, आम्ही आमच्या सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करू आणि याची घोषणा लवकरच होईल. उत्तर प्रदेशात आम्ही समाजवादी पक्षाला पाठिंबा दिला आहे. आम्ही उत्तर प्रदेशात एकही जागा घेतली नाही, पण इथे आम्ही त्यांना काही जागा देत आहोत. समाजवादी पक्ष, सीपीएम, सीपीआय आणि आप महाविकास आघाडीचा भाग आहेत. आम्ही सर्व पक्षांना प्रतिनिधित्व देत आहोत. पण जागा मर्यादित आहेत."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT