विधानसभा संघर्ष Pudhari File Photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Maharashtra assembly election 2024 : पूर्वीपासून नव्हते २८८ मतदारसंघ !

जागा वाटपाचे गुऱ्हाळ; नंतरच्या काळात मतदारसंघांचा आकडा २८८ वर गेला

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाइन डेस्क - महायुती, महाविकास आघाडीत कोणते आणि किती मतदारसंघ, कोणत्या पक्षाला सुटतात याची उत्सुकता संपलेली नाही. जागा वाटपाचे गुऱ्हाळ अजून सुरूच आहे. मात्र, ज्या २८८ जागांवरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे, तेवढ्या जागा विधानसभा निवडणुकीसाठी आधीपासूनच नव्हत्या. पहिली निवडणूक २६४ मतदारसंघांसाठी झाली होती. नंतरच्या काळात वारंवार बदल होऊन मतदारसंघांचा आकडा २८८ वर गेला... आता २०२६ मध्ये मतदारसंघ पुनर्रचना होणार आहे. त्यामुळे या जार्गात वाढ होण्याची शक्यता आहे

  • १९५७ साली मुंबई प्रांताच्या निवडणुका झाल्या. त्यात महाराष्ट्रासह गुजरातचाही मोठा भाग मुंबई प्रांतात होता. २६४ जागांसाठी मतदान झाले.

  • स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्यात १९६२ साली पहिल्या निवडणुका पार पडल्या. त्याही २६४ मतदारसंघांतच झाल्या.

  • १९६२ मध्ये २६४ मतदारसंघ मुंबई, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र अशा चार विभागांमध्ये विभागलेले होते.

  • १९६७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघांची संख्या २६४ वरून २७० वर गेली, १९७३ मध्ये मतदारसंघ पुनर्रचना करण्यात आली. यानुसार महाराष्ट्रातील मतदारसंघांची संख्या २८८ वर गेली.

  • १९७८ साली झालेल्या निवडणुकांमध्ये २८८ मतदारसंघांमधून जवळपास १८०० हुन जास्त उमेदवार रिंगणात होते.

२००८ मध्ये पुनर्रचना; पण मतदारसंघ तेवढेच

१९७८ च्या निवडणुकांनंतर १९८५, १९९०, १९२५, १९९९, २००४ या पाचही निवडणुकांत मतदारसंघांची संख्या २८८ हीच होती. २००१ च्या जनगणनेच्या आधारावर पुन्हा २००८ मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली. त्यामध्ये काही मतदारसंघांचे आकार कमी किंवा जास्त करण्यात आले. काही भाग समाविष्ट करण्यात आला, तर काही भाग इतर मतदारसंघांना जोडला गेला; पण मतदारसंघांची संख्या २८८च ठेवण्यात आली

असं आहे आरक्षण...

२९ मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी, २५ मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी, तर उरलेले २३४ मतदारसंघ खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी आहेत.

२०२६ मध्ये पुनर्रचना होणार

देशभरात २०२६ मध्ये मतदारसंघ पुनर्रचना होणार आहे. २०२९ च्वा निवडणुका नव्या मतदारसंघांमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींबरोबरच महिलांसाठीचेही आरक्षण लागू असेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT