पुढारी ऑनलाईन डेस्क: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आज (दि.४) शेवटचा दिवस होता. दरम्यान, राजेश लाटकर यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.
कोल्हापूर काँग्रेसमधून सुरूवातीला राजू लाटकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर लाटकर यांच्या उमेदवारीला काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केला. यानंतर काँग्रेसने पुन्हा मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, कोल्हापूर उत्तरची निवडणुक महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर आणि महाविकास अघाडीच्या मधुरिमाराजे छत्रपती अशी लढत अधिक अतितटीची आणि प्रतिष्ठेचे बनली होती. मात्र आज मधुरिमाराजे छत्रपती यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे.