अहमदपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटलांचा विजय झाला pudhari
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Latur Election Result - अहमदपूरमध्ये बाबासाहेब पाटील यांची विजयाला गवसणी

लातूर - अहमदपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटलांचा विजय

पुढारी वृत्तसेवा

अहमदपूर (लातूर) : २०२४ च्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील हे विक्रमी मताधिक्यांनी विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विनायकराव जाधव - पाटील यांचा ३१ हजार ६६९ मतांनी पराभव झाला. जनसुराज्य शक्तीचे गणेश हाके हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत.

२३ नोव्हेंबर रोजी शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला. अहमदपूर चाकूर तालुक्याचा समावेश असलेल्या या मतदारसंघात ३७६ मतदान केंद्रांवर २३८०७४ इतके मतदान झाले होते. मतमोजणीस २७ फेऱ्या निश्चित करण्यात आल्या होत्या. पहिल्या फेरीपासून सातव्या फेरीपर्यंत जनसुराज्य शक्तीचे उमेदवार गणेश हाके हे आघाडीवर होते. आठव्या फेरीपासून विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील हे गणेश हाके यांचे मताधिक्य तोडून १३३५ मतांनी आघाडीवर राहिले ते शेवटपर्यंत २७ व्या फेरीपर्यंत त्यांचे मताधिक्य ३१६६९ मताधिक्य वाढतच गेले. शेवटी त्यांनी विजयाला गवसणी घातली. विजयी उमेदवार बाबासाहेब पाटील यांना ९६९०५ , त्यांचे प्रतिस्पर्धी माजी मंत्री विनायकराव जाधव-पाटील यांना ६५२३६ तर जनसुराज्य शक्तीचे गणेश हाके यांना ६२४४७ मते मिळाली आहेत.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून सातव्या फेरीपर्यंत गणेश हाके हे आघाडीवर होते. दुसर्‍या स्थानी विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील हे होते. आठव्या फेरीपासून आमदार बाबासाहेब पाटील यांचे मताधिक्य वाढत गेले. त्यांच्यात आणि गणेश हाके यांच्यात लढत सुरू होती. मात्र, बाबासाहेब पाटील यांचे मताधिक्य वाढतच जात होते. १९ व्या फेरी अखेर बाबासाहेब पाटील पहिला स्थानावर व विनायकराव जाधव-पाटील हे पहिल्यांदाच दुसर्‍या स्थानावर आले. मात्र बाबासाहेब पाटील व विनायकराव जाधव-पाटील यांच्या मतातील तफावत ही खूप मोठी होती. शेवदी आमदार बाबासाहेब पाटील यांनी विजयाला गवसणी घातली तर विनायकराव जाधव-पाटील हे दुसर्‍या स्थानावर व गणेश हाके हे तिसऱ्या स्थानावर राहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT