जळगाव : जिल्ह्यामध्ये निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत, या वाऱ्यांमध्ये युतीने आघाडी घेतलेली आहे. युतीचा समन्वय निर्धार मेळा नुकताच आदित्य लॉन येथे पार पडला. यावेळी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, गुरुवार (दि.24) रोजी ते जळगाव ग्रामीण मधून नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत. यावेळी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि आरपीआय महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जळगावात महायुतीच्या पहिल्याच समन्वय निर्धार मेळाव्याला भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील हे दोघेही गैरहजर असल्याने चर्चांना उधाण आले आहे. जळगावातील आदित्य लॉन येथे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीचा निर्धार मेळावा पार पडला.
राज्यात नव्हे तर जिल्ह्यातही निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहे. यामध्ये आघाडीच्या उमेदवारांची अजून नाव जाहीर झाले नाही. युतीमधील राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, भाजपा यांनी आपापले उमेदवार जाहीर केलेले आहेत. राष्ट्रवादीने दिलेल्या सतरा एबी फॉर्म मध्ये जळगाव जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल भाईदास पाटील यांचे सुद्धा नाव आहे तर भाजपाने जळगाव जिल्ह्यातील विद्यमानांना संधी देत रावेर मधून स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र व रावेर लोकसभेचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांना संधी दिली आहे तर शिंदे गटाकडून विद्यमान संधी दिली जात आहे.
या दृष्टीने मंगळवार (दि.22) रोजी जळगाव शहरामध्ये तालुका स्तरावर महायुतीचा समन्वय निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात छोट्या मोठ्या तक्रारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय व्हावा यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. माध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, नेहमीप्रमाणे आघाडीला उमेदवाराची आयात किंवा शोध घ्यावा लागतोय. आम्हाला माहिती आहे की,आमच्या स्पर्धेत कोण आहे? फक्त त्याच्या नावाची घोषणा होणे बाकी आहे. पाच कोटींची रक्कम पकडले गेले. त्यावर राऊत यांनी शिंदे सेनेवर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले की, ज्यांना हफ्ते घेण्याची सवय असेल त्यांनाच हफ्ते माहीत असतात. असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला.