जळगाव ः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आपली पहिली यादी जाहीर करत जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण जामनेर व मुक्ताईनगर येथील उमेदवारांची नावे जाहीर केली.जिल्हयातील मतदारसंघात नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता होती. ती आता संपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील तीन उमेदवारांचा समावेश आहे.
जामनेरमधून दिलीप खोडपे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे जळगाव ग्रामीणमध्ये दोघ गुलाबराव यांच्यामध्ये सामना रंगणार आहे तर गेल्या वेळेस भाजपाच्या उमेदवार असलेल्या व विद्यमान राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला अध्यक्ष रोहिणी खडसे व शिंदे सेनेचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यात काट्याची लढत होणार आहे. तर जामनेर मध्ये एकीकडे गिरीश महाजन यांचे विश्वासातील सहकारी दिलीप खोडपे यांनी निवडणुकीपूर्वीच भाजपाला रामराम करीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला व जामनेरातून गिरीश महाजन यांनाच आव्हान दिले आहे. हा सामना कितपत रगणार हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.