वडीगोद्री : विधानसभेचे माजी उपसभापती नरहरी झिरवळ यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. मनोज जरांगे यांच्या राहत्या घरी जाऊन झिरवळ यांनी भेट घेतली. मनोज जरांगे यांच्या घरी त्यांचे वडील रावसाहेब जरांगे यांच्याशी झिरवाळ यांनी गप्पा मारल्या. त्यानंतर झिरवाळ मनोज जरांगे यांच्यासोबत अर्धा तास चर्चा केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.
मनोज जरांगे यांची मागणी अत्यंत रास्त आहे म्हणूनच त्यांच्या मागे लोक आहेत अशी प्रतिक्रिया नरहरी झिरवळ यांनी जरांगे यांच्या भेटीनंतर दिली आहे. जरांगे यांच्या निवडणूक लढवण्याच्या आजच्या निर्णयावर बोलण्या एवढा मी मोठा नाही असं देखील झिरवळ यांनी नमूद केलं आहे