निवडणूक विशेष : मंत्र्यांचे धक्कादायक पराभव  File Photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

निवडणूक विशेष : मंत्र्यांचे धक्कादायक पराभव

पुढारी वृत्तसेवा

२०१९ च्या निवडणुकीत ३७ पैकी ९ मंत्र्यांना मतदारांनी दिला होता धक्का. यात दोन कॅबिनेट मंत्री आणि सात राज्यमंत्र्यांचा समावेश होता. (Maharashtra Legislative Assembly election)

पंकजा मुंडे 

परळी मतदार संघातून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा चुलतभाऊ राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांनी ३० हजारांहून अधिक मतांनी त्यांचा पराभव केला.

त्यानंतर पक्षाने त्यांना चालू वर्षी लोकसभा निवडणुकीतही उमेदवारी दिली. मात्र, त्यांचा निसटता पराभव झाला. अखेर विधान परिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे विजयी होऊन पुन्हा आमदार झाल्या.

राम शिंदे

कर्जत-जामखेड हा १९९५ पासून भाजपचा बालेकिल्ला. तरीही राम शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी ४३ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला.

संजय (बाळा) भेगडे

मावळमध्ये २५ वर्षांचे भाजपचे वर्चस्व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांनी संपवले. त्यांनी संजय (बाळा) भेगडे यांचा ९५ हजार मतांनी पराभव केला. शेळके आधी भाजपातच होते, पण निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विजय शिवतारे : विजय शिवतारे हे पुणे जिल्ह्यातील पुरंदरचे तीन वेळा आमदार राहिले. मात्र, चौथ्यांदा काँग्रेसने पराभूत केले. संजय जगताप यांचा या निवडणुकीत विजय झाला होता.

अर्जुन खोतकर

जालन्यात शिवसेनेचे अर्जुत खोतकर यांचा पराभव झाला तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. २५ हजारांचे मताधिक्य घेऊन काँग्रेसचे कैलास गोरंट्याल विजयी झाले होते.

अनिल बोंडे

मोर्शीमध्ये भाजप नेते अनिल बोंडे यांचा निसटता पराभव झाला होता. ९ हजार ७९१ मताधिक्य घेऊन स्वाभिमानी पक्षाचे नेते देवेंद्र भुयार यांनी त्यांना हरविले होते.

जयदत्त क्षीरसागर

बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांना पुतण्यानेच पराभवाचे तोंड दाखवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप क्षीरसागर यांनी अवघ्या १ हजार ९८४ मतांनी त्यांचा पराभव केला. जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणुकीपूर्वी आमदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्रिपद दिले होते.

अंबरीश आत्राम

अहेरी मतदारसंघ नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम यांनी भाजपचे अंबरीश आत्राम यांचा जवळपास १५ हजार ४५८ मतांनी पराभव केला होता.

मदन येरावार

यवतमाळमध्ये काँग्रेसचे अनिल ऊर्फ बाळासाहेब शंकरराव मांगूळकर यांनी आठ हजार मतांच्या फरकाने भाजपचे मदन येरावार यांचा पराभव केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT