ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्यातील कोपरी-पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचे आशीर्वाद घेत शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी संत एकनाथ महाराज यांच्या वंशज कडून आशीर्वाद घेतले. रथावर महायुतीचे नेते उपस्थित आहेत.
कोपरी-पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. थो़ड्याच वेळात ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.