राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने २३ उमेदवारांची दुसरी यादी आज शनिवारी जाहीर केली. File Photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Maharashtra Assembly Elections 2024 | काँग्रेसकडून २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

शिरोळमधून गणपतराव पाटील यांना उमेदवारी

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Elections 2024) काँग्रेसने २३ उमेदवारांची दुसरी यादी आज शनिवारी जाहीर केली. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळमधून गणपतराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Congress candidates list : २३ उमेदवारांची यादी

  1. भुसावळ- राजेश मानवतकर

  2. जळगाव (जामोद)- स्वाती वाकेकर

  3. अकोट- महेश गंगाणे

  4. वर्धा- शेखर शिंदे

  5. सावनेर- अनुजा केदार

  6. नागपूर दक्षिण- गिरीश पांडव

  7. कामठी- सुरेश भोयर

  8. भंडारा- पूजा थावकर

  9. अर्जुनी- मोरगाव- दिलीप बनसोड

  10. आमगांव- राजकुमार पुरम

  11. राळेगाव- वसंत पुरके

  12. यवतमाळ- अनिल मंगूळकर

  13. अर्नी- जितेंद्र मोघे

  14. उमेरखेड- साहेबराव कांबळे

  15. जालना- कैलास गोरंट्याल

  16. औरंगाबाद पूर्व- मधूकर देशमुख

  17. वसई- विजय पाटील

  18. कांदिवली पूर्व- कालू बधेलिया

  19. चारकोप- यशवंतराव सिंह

  20. सायन कोळिवाडा- गणेश यादव

  21. श्रीरामपूर- हेमंत ओगले

  22. निलंगा- अभयकुमार साळुंखे

  23. शिरोळ- गणपतराव पाटील

पक्षांतर्गत सर्व पातळीवर चर्चा पूर्ण

महाविकास आघाडीत काँग्रेसच्या कोट्यात येऊ शकणाऱ्या जवळजवळ सर्व जागांवर पक्षांतर्गत सर्व पातळीवर चर्चा झाली आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत काही जागांवर चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर आज २३ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT