विधानसभा महासंग्राम.  file photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Assembly Elections | राज्यात 46 वर्षांत कोणत्याच पक्षाने लढविल्या नाहीत 288 जागा

आमने-सामने लढतीने महाराष्ट्रातील निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा
ठाणे : दिलीप शिंदे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच एकाच नावाचे दोन राज्यस्तरीय पक्ष हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढविणार आहेत. त्यातील प्रत्येकी दोन-दोन पक्ष हे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सामील होऊन आमने - सामने लढत असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. (It has been seen that no party has contested 288 seats in the last 24 years despite the presence of state level parties)

राज्यात 145 नोंदणीकृत पक्ष आणि सहा राष्ट्रीय व चार राज्यस्तरीय पक्ष असतानाही गेल्या 24 वर्षात कुठल्याही पक्षाने 288 जागा लढविल्याच नसल्याचे दिसून आले आहे. सर्वात सक्षम असलेल्या काँग्रेसने 1978 पासून कधीच 288 जागांवर उमेदवार उभे केलेले नाहीत. तोच किस्सा अन्य पक्षांनीही गिरविल्याचे दिसून येते. (Maharashtra assembly election 2024)

राज्यातील 288 विधानसभा मतदार संघासाठी उमेदवारी निश्चिती आणि जागा वाटपाची लगबग सुरु झालेली आहे. या निवडणुकीत राज्यातील 145 नोंदणीकृत पक्ष आणि सहा राष्ट्रीय आणि पाच राज्यस्तरीय पक्ष निवडणूक लढवू शकतात. त्यामध्ये काँग्रेस, भाजप, आप, सीपीआय (एम), बीएसपी नॅशनल पीपल पार्टी ( एनपीपी) या राष्ट्रीय पक्षाचा आणि मनसे, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे याची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या पाच राज्यस्तरीय पक्षांचा समावेश आहे. दुसरीकडे देशभरात 2 हजार 763 नोंदणीकृत पक्ष असून सहा राष्ट्रीय पक्ष आणि 58 राज्यस्तरीय पक्षांची नोंद निवडणूक आयोगाकडे आहे.

राज्यातील 288 विधानसभा मतदार संघात 9 कोटी 63 लाख मतदार हे आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 4 कोटी 97 लाख पुरुष आणि 4 कोटी 66 लाख स्त्री मतदार आहेत. 1 लाख 186 मतदान केंद्र असून त्यामध्ये सर्वाधिक 57 हजार 582 मतदान केंद्र हे ग्रामीण भागात आहेत. 42 हजार 604 मतदार हे शहरी भागातील आहेत. तब्बल 1 कोटी 55 लाख तरुण मतदार हवं 20 ते 29 वयोगटातील असून 20 लाख 93 हजार मतदार हे पहिल्यांदा मतदानाचा हक्क बाजवणार आहेत. एवढ्या मोठ्या लोकशाहीच्या उत्सवात मतदार राजा आपला प्रतिनिधी तसेच आपले सरकार निवडणार आहे. मात्र राज्यातील एकही राजकीय पक्ष नाही जो सर्वच्या सर्व 288 विधानसभेच्या जागा लढवित आहे. सत्तेसाठी बनलेल्या आघाड्या व युती तसेच पराभूत होण्याच्या भीतीने एकाही राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षाने 288 जागांवर निवडणूक लढविण्याचे धारिष्ट्य दाखविलेले नाही. काँग्रेसने 1985 मध्ये विधानसभा निवडणुकीत 288 पैकी 287 जागा लढविल्या होत्या. 1990 मध्ये 276 लढविल्या.

आघाड्या आणि युतीमुळे होतो घोळ

आणीबाणीनंतर झालेल्या 1978 मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 259 जागा तर जनता पार्टीने 215 जागांवर उमेदवार उभे केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर 1999 मध्ये सर्वाधिक 223 जागांवर उमेदवार उभे केले होते. भाजप आणि शिवसेनेने देखील कधीच दोनशेचा आकडा पार केलेला नाही. स्वबळाचा नारा देणार्‍या मनसेने 2014 मध्ये सर्वाधिक 219 जागांवर उमेदवार उभे केले होते. एकंदरीत आघाड्या आणि युतीमुळे गेल्या 46 वर्षांपासून एकाही पक्षाने 288 जागा लढविलेल्या नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT