दहिवडी : माण विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सुमारे 23 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर एकूण 27 उमेदवारांनी अर्ज मंगळवारअखेर दाखल केले असल्याची माहिती प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी दिली.
माण विधानसभा मतदार संघासाठी आर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 76 जणांना 120 नामनिर्देशन अर्जांची विक्री केली आहे. दादासाहेब गणपत दोरगे (रासप), अनिल रघुनाथ पवार (स्वाभिमानी पक्ष), अरविंद बापू पिसे (प्रहार जनशक्ती), अजित दिनकर नलवडे (बहुजन मुक्ती पार्टी), श्रीमती सारिका अरविंद पिसे (प्रहार जनशक्ती पार्टी), सत्यवान विजय ओंबासे (स्वराज्य सेना महाराष्ट्र), अर्जुनराव उत्तमराव भालेराव (रिपब्लिकन सेना), इम्तियाज जाफर नदाफ ( वंचित बहुजन आघाडी), ज्योत्स्ना अनिल सरतापे (बहुजन मुक्ती पार्टी व अपक्ष), जयदिप पांडुरंग भोसले (राष्ट्रीय मराठा पार्टी) यांनी पक्षाकडून तर विकास सदाशिव देशमुख, नानासो रामहरी यादव, जितेंद्र गुलाब अवघडे, सोमनाथ लक्ष्मण शिर्के, अजिनाथ लक्ष्मण केवटे, प्रभाकर किसन देशमुख, संदिप नारायण मांडवे (सांळुखे), नागेश विठ्ठल नरळे, नारायण तातोबा काळेल, ज्ञानेश्वर रेवण विरकर, नंदकुमार उर्फ नानासो महादेव मोरे, हर्षराज एकनाथ काटकर, अमोल शंकरराव घार्गे, संभाजी एकनाथ जाधव यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेे.