महायुतीत मिठाचा खडा, मिटकरींची चंद्रकांत पाटलांवर टीका  File Photo
महाराष्ट्र

महायुतीत मिठाचा खडा, मिटकरींची चंद्रकांत पाटलांवर टीका

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: 'मी पुण्याचा पालकमंत्री असतानाही चिंता करायला लावणाऱ्या घटना घडल्या नसल्याचे' वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केले. यावर अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी '...म्हणुन चंद्रकांत दादा व्यथीत' अशा शब्दात नाराजी व्यक्त करत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. यावरून महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

...त्यांच्या आशीर्वादाने सर्व काही व्यवस्थित

राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, " चंद्रकांत दादा पुण्याचे पालकमंत्री असताना ड्रग्जसासारख्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत. कारण त्यांच्या आशीर्वादाने हे सर्व काही पुण्यात व्यवस्थित सुरू होते. अजितदादा पालकमंत्री झाल्यामुळे ह्या सर्व चिंताजनक घटना आज उघड झाल्या म्हणुन चंद्रकांत दादा व्यथीत आहेत.

"दादा वेळेत आले म्हणून..."; मिटकरींची टीका

यापूर्वी शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी रामदास कदम यांनी 'अजित दादा आणखी थोडे दिवस महायुतीत आले नसते तर चालले असते' असे म्हणत महायुतीच्या लोकसभेतील जागांवर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे अजित पवार यांच्या गटात नाराजी पसरली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी रामदास कदम (Amol Mitkari) यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT