आज बुधवारी सकाळी बारामतीत एक गंभीर आणि धक्कादायक घटना घडली. अजित पवार यांना घेऊन येणाऱ्या खासगी विमानाचा बारामती एमआयडीसी परिसरातील विमानतळावर उतरत असताना अपघात झाला.
अपघाताचे दृश्य अत्यंत धक्कादायक आणि विदारक असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अपघात मोठा असल्याचे फोटोंमधून स्पष्ट दिसते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
अपघात नेमका कसा झाला याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
विमानाचे तुकडे रस्त्यावर विखुरलेले असल्याचे विदारक दृश्य पाहायला मिळते.
बुधवारी सकाळी बारामती एमआयडीसी परिसरातील विमानतळावर उतरत असताना अजित पवार यांना घेऊन येणाऱ्या खासगी विमानाला अपघात झाला.
सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, वैद्यकीय पथके आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला.
मृतदेह तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
रुग्णालयात नागरिकांची गर्दी झली होती
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अपघाताची तीव्रता मोठी होती. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण होते.