अहमदनगर

शेवगावकरांना ‘तिरंगा रॅली’चे आकर्षण

अमृता चौगुले

शेवगाव तालुका : वृत्तसेवा : शेवगाव शहरातून निघालेल्या ऐतिहासिक तिरंगा रॅलीत आ. मोनिका राजळे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, विद्यार्थी, नागरिकांनी उत्साहात सहभागी झाले. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामार्फत 111 फूट लांब व दहा फूट रुंद तिरंग्याची मिरवणूक व भारत मातेची प्रतिमा असलेला रथ, या रॅलीचे आकर्षण ठरला. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहे. अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पक्ष, संघटना जाती-पातीचा भेदभाव दूर करत शेवगाव शहरात ऐतिहासिक तिरंगा रॅलीचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते.

तिरंगा रॅली यशस्वी होण्याकरिता आमदार मोनिकाताई राजळे, उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार छगन वाघ, पोलिस निरीक्षक विलास पुजारी, गटविकास अधिकारी महेश डोके, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव, डॉ. नीरज लांडे आणि सर्व राजकीय पक्ष संघटनांचे मोठे योगदान लाभले. शेवगाव शहरांतर्गत खंडोबा मैदान येथून तिरंगा रॅलीचे प्रस्थान होऊन स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चौक, राष्ट्रसंत गाडगेबाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नवीन कोर्ट, क्रांती चौक, महात्मा गांधी पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गे शहरातील खालची वेस येथील सभागृहात रॅलीचा समारोप झाला. यावेळी मार्गात येणार्‍या सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

या भव्य तिरंगा रॅलीची सुरुवात होताच वरूणराजाचे आगमन झाले. देशप्रेमाने भारावून गेलेले शेकडो विद्यार्थी, नागरिक भारत मातेचा जयजयकार करताना पावसाच्या सरीत न्हावून निघाले होते. या तिरंगा रॅलीत माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे, शिवाजीराव काकडे, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, शेतकरी संघटनेचे दत्ता फुंदे, गणेश रांधवणे, विनोद मोहिते, अशोक आहुजा, सुनील रासने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. कृष्णा देहडराय, डॉ. नीरज लांडे, जगदीश धूत, हरीश शिंदे, सागर फडके, महेश फलके, गणेश कोरडे, दिगंबर काथवटे, प्राध्यापक नितीन मालानी, राष्ट्रवादीचे संजय फडके, एजाज काझी. प्रताप फडके, अजिंक्य लांडे, ताराचंद लोढे, रवींद्र सुरवसे, भीमराज सागडे, संदीप वाणी, आशा गरड, रोहिणी फलके, उषा कंगनकर, पांडुरंग तहकीक, तसेच शेवगाव शहरातील विद्यालय महाविद्यालय मधील विद्यार्थी, शिक्षक, नागरिक उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT