अहमदनगर

‘लम्पी’वर राज्यामध्ये लस विकसित करणार : पशुसंवर्धन मंत्री विखे

अमृता चौगुले

लोणी : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील 33 जिल्ह्यात 1 लाख 78 हजार 72 गोवर्गीय जनावरे लम्पी चर्मरोगाने बाधित झाले होते, मात्र वेळेत 100 टक्के लसीकरण केल्याने पशुधनांचे मृत्यू कमी झाले, असे सांगत सप्टेंबर 2023 पर्यंत लंपी लसीकरणात महाराष्ट्र स्वयंपूर्ण होणार आहे. राज्यात ही लस तयार होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी विधान परिषदेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लम्पी चर्मरोगाबाबत प्रश्न उपस्थित केला . या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री विखे पा. बोलत होते.

विखे म्हणाले, राज्यात काही जिल्ह्यात लम्पी आजार बळावला होता. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तातडीने लसीकरणाचा निर्णय घेतला. राज्य शासनाने 100 टक्के लसीकरण गतीने केल्याने पशुधनाचा मृत्यू दर कमी झाला. राज्याने विशिष्ट पद्धती अवलंबल्याने लसीकरण पूर्ण झाले. प्रत्येक जिल्ह्यात औषध बँक व 3 कोटी रुपये दिले. राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने स्वीकारल्या, असे विखे म्हणाले.

आत्तापर्यंत 3383.85 लाख रुपयांचा निधी मृत पशुधनाच्या पशु पालकांना वाटप केला. उर्वरित पशु पालकांना 15 दिवसांत मदत देण्यात येईल. पशुवर स्वतः उपचार केले असल्यास शेतकर्‍यांना योग्य परतावा दिला जाईल. शिवाय पशुसंवर्धन दवाखान्यातील रिक्त जागा येत्या दोन महिन्यांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतील, असेही उप प्रश्नाला उत्तर देताना ना. विखे पा. म्हणाले.

SCROLL FOR NEXT